अमित ठाकरे यांची पत्नी मिताली ठाकरे यांच्या भावाचे डॉ. राहुल बोरडे यांचा विवाहसोहळा आज दिल्लीत पार पडला. या विवाहसोहळ्याला अनेक राजकीय मंडळीनी हजेरी लावली. तसेच या शाही विवाह सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. अमित ठाकरे आणि मोदींचा फोटो सध्या चांगला व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं स्टेजवर?
मिताली ठाकरे यांचे बंधू डॉ. राहुल बोरुडे यांना शुभेच्छा देण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेजवर गेले. पंतप्रधान स्टेजवर गेले असताना फोटोसेशन सुरू होते. त्याचवेळी खालून अमित ठाकरे हे त्यांचा मुलगा किआना ठाकरे याला कडेवर घेऊन स्टेजवर गेले. अमित ठाकरे पंतप्रधानांच्या जवळ जाताच त्यांनी किआन ठाकरे याचे गाल ओढले. त्यानंतर अमित ठाकरे हे किआनसोबत मोदींच्या बाजूला उभे राहिले आणि पुन्हा फोटोसेशन पार पडलं. च्या दिल्लीतील विवाह समारंभाला पंतप्रधानांनी उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
advertisement
राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदींची भेट?
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या सोहळ्याला राज ठाकरे देखील उपस्थित होते. हा विवाहसोहळा दिल्लीतील हयात हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी राज ठाकरे आणि मोदींची भेट झाल्याचे देखील वृत्त समोर आले आहे. मात्र या भेटीचा फोटो किंवा अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लग्न सोहळ्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश तसेच विविध पक्षाचे दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते.
