TRENDING:

Rajura Bogus Voter : राजुरातील बोगस मतदार प्रकरणी नवा ट्वीस्ट, निवडणूक आयोगाकडून स्वत: चे कौतुक, पण...

Last Updated:

Rajura Bogus Voter Election Commission : राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघातील मतदार यादीच्या घोळाबाबत भाष्य केले. मात्र, निवडणूक आयोगाने या प्रकरणी आम्हीच तक्रार केल्याचे सांगत स्वत: ची पाठ थोपटून घेतली. पण, या प्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राजुरातील बनावट मतदार प्रकरणी नवा ट्वीस्ट, निवडणूक आयोगाकडून स्वत: चे कौतुक, पण...
राजुरातील बनावट मतदार प्रकरणी नवा ट्वीस्ट, निवडणूक आयोगाकडून स्वत: चे कौतुक, पण...
advertisement

चंद्रपूर : देशाचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मतदारयादीतील बनावट मतदार आणि मतदारयादीतील पात्र मतदार वगळण्याबाबत गंभीर आरोप करत निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मात्र, निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले. काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघातील मतदार यादीच्या घोळाबाबत भाष्य केले. मात्र, निवडणूक आयोगाने या प्रकरणी आम्हीच तक्रार केल्याचे सांगत स्वत: ची पाठ थोपटून घेतली. पण, या प्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

advertisement

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात उघडकीस आलेल्या तब्बल 6 हजार 861 बनावट मतदार नोंदणी प्रकरणामुळे राजकीय आणि प्रशासनिक वर्तुळात खळबळ माजली. मात्र या गंभीर घोटाळ्याच्या तपासात पोलिसांना मोठा अडथळा येत असल्याचे समोर आले असल्याची माहिती समोर आली आहे. दैनिक लोकसत्ताने याबाबतचे वृत्त दिले आहे.

advertisement

निवडणूक आयोगाकडून डेटा देण्यास टाळाटाळ?

सूत्रांच्या माहितीनुसार, चंद्रपूर पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास पुढे नेण्यासाठी राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडे पाच ते सहा वेळा लेखी मागणी केली. त्यामध्ये ऑनलाइन अर्जाचे तांत्रिक तपशील, संबंधित मोबाइल क्रमांक, ‘आयपीअ‍ॅड्रेस आणि सर्व्हर लॉग यांसारखी महत्त्वाची माहिती मागवण्यात आली होती. मात्र आयोगाकडून अद्याप कोणताही डेटा उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.

advertisement

सूत्रधारांना अटक कशी करणार?

यामुळे पोलिसांच्या तपासाची गती संथ झाली असून, आरोपींना अटक करणे किंवा खऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. "डेटा उपलब्ध न झाल्यास आरोपींवर ठोस कारवाई करणे अवघड आहे. आवश्यक माहितीशिवाय मूळ सूत्रधारांपर्यंत पोहोचणे जवळपास अशक्य आहे," असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

advertisement

दरम्यान, चंद्रपूर जिल्हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाकडे ही माहिती मागवण्यात आली होती. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने तपास प्रक्रियेत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक आयोगाने काय म्हटले होते?

राजुरा मतदारसंघात बनावट मतदार नोंदणीबाबत आरोप झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आरोप फेटाळून लावत एक निवेदन जारी केले.

निवडणूक आयोगाने म्हटले की, राजूरा विधानसभा मतदारसंघाचे, मतदार नोंदणी कार्यालयात 1 ते 17 ऑक्टोबर 2024 या कालावधीत एकूण 7,592 नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाले. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) सदर अर्जांची तपासणी केली असता, यात अर्जदार दिलेल्या पत्त्यावर वास्तव्यास नसणे, अर्जदार अस्तित्वात नसणे तसेच आवश्यक छायाचित्रे व पुरावे जोडलेले नसणे या त्रुटी निदर्शनास आल्या. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणीअंती सदर 7,592 अर्जांपैकी 6,861 अर्ज अवैध ठरविण्यात आले. या अर्जांची मतदार यादीत नोंद करण्यात आलेली नाही.

या प्रकरणाची जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर यांनी त्याच वेळेस गंभीर दखल घेऊन मतदार नोंदणी अधिकारी व उपविभागीय अधिकारी, राजुरा यांना सर्वच अर्जांची सखोल चौकशी करण्याचे व लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत आवश्यक ती गुन्हेगारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. सदर निर्देशांच्या अनुषंगाने राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र.629/2024 नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस विभागामार्फत करण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rajura Bogus Voter : राजुरातील बोगस मतदार प्रकरणी नवा ट्वीस्ट, निवडणूक आयोगाकडून स्वत: चे कौतुक, पण...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल