Rahul Gandhi On Rajura : राहुलने आरोप केले, 6850 मतदार वाढले, पण राजुरात निवडणूक कोणी जिंकली?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Rahul Gandhi On Rajura Bogus Voters : आज झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील आळंद मतदारसंघातील मतदारांची नावे वगळण्याबाबतची माहिती सादर केली. त्याच दरम्यान राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघाचा उल्लेख करत आणखी एक आरोप केला.
नवी दिल्ली: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत व्होट चोरीचा दावा करताना निवडणूक आयोगाला थेट लक्ष्य केले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील आळंद मतदारसंघातील मतदारांची नावे वगळण्याबाबतची माहिती सादर केली. त्याच दरम्यान राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघाचा उल्लेख करत आणखी एक आरोप केला.
advertisement
राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत कर्नाटकमधील आळंद मतदारसंघातील मतदार वगळण्याचे प्रकरण समोर आणलं. कर्नाटकमधील आळंद मतदारसंघातून 6018 मतदारांची नावं वगळण्यात आल्याचा दावा केला. मतदारांना कल्पनाच नाही की त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहे. दलित, अल्पसंख्याक मतदारांची नावे मतदारयादीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. कर्नाटक बाहेरील मोबाइल क्रमांकावरून मतदारांची नावे वगळण्यात आली. अर्ज कोणी केले, ओटीपी कोणाला गेले, हे सगळं संशयास्पद असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
advertisement
राहुल गांधी यांनी म्हटले की, ज्या बुथवर काँग्रेसला चांगली मते मिळाली होती. त्याच ठिकाणी मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. निवडणुकीत काँग्रेस आणि इतर विरोधकांच्या मतदारांची नावे वगळण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. आधीच्या पत्रकार परिषदेत नवीन बोगस मतदार कसे जोडले जातात, याची माहिती दिली. आता या पत्रकार परिषदेत नाव कशी वगळली हे दाखवलं असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. उत्तर प्रदेश, हरयाणा, महाराष्ट्रातही असाच प्रकार झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. महाराष्ट्रातील राजुरामध्ये 6850 मतदार घुसवण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
advertisement
राजुरामध्ये 6850 बोगस मतदारांचा आरोप, भाजपचं मताधिक्य किती?
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघाचा उल्लेख राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला. या मतदारसंघात मागील दोन टर्ममध्ये चुरशीची निवडणूक झाली होती. राहुल गांधी यांनी या मतदारसंघात 6850 मतदार बोगस असल्याचा आरोप केला. त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणूक निकालाला चांगलेच महत्त्व आले.
advertisement
राजुरामध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सुभाष धोटे यांचा विजय झाला होता. त्यांना 60 हजार 228 मते मिळाली. तर, वामनराव चटप यांना 57 हजार 727 आणि भाजपच्या संजय धोटे यांना 51 हजार 051 मते मिळाली. काँग्रेसचा अवघ्या 2,509 मतांनी विजय झाला.
advertisement
राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या 2024 मधील निवडणुकीत भाजपचे देवराव भोंगळे यांचा विजय झाला. त्यांना 72 हजार 882 मते मिळाली. तर, काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांना 69 हजार 828 मते मिळाली. तर, तिसऱ्या स्थानावरील स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप यांना 55 हजार 090 मते मिळाली. भाजपचा या मतदारसंघात अवघ्या 3,054 मतांनी विजय झाला.
advertisement
एवढ्या चुरशीच्या निवडणुकीत यंदा भाजपने बाजी मारली. तर, दुसरीकडे राहुल गांधी यांनी केलेल्या बोगस मतदारांवरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
इतर संबंधित बातमी:
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 2:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rahul Gandhi On Rajura : राहुलने आरोप केले, 6850 मतदार वाढले, पण राजुरात निवडणूक कोणी जिंकली?