यानंतर आता रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर पलटवार केला आहे. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन अगदी खालच्या पातळीचे शब्द वापरून खालच्या पातळीची टीका केलीय. त्यांनी नीच शब्द वापरला. पण माझा प्रश्न असा की, माझे प्रश्न मातोश्रीचे आहेत. शेवटचे 2 दिवस बाळासाहेब यांची बॉडी अशी ठेवावी का? अशी मागणी मी केली. यावर उद्धव ठाकरे यांनी बोलायला हवं होतं, असंही रामदास कदम म्हणाले.
advertisement
अनिल परबांवर टीका करताना रामदास कदम म्हणाले, ?याची लायकी नाहीय माझ्या पायसमोर उभं राहायची. आज पक्ष फुटला. सगळे नेते बाहेर आहेत. याचं कारण हा आहे. तो फक्त उद्धव ठाकरेंना चुगल्या करतो. ते हॉटेल्स वरून बोलले. तो डान्स बार नव्हता फक्त ऑर्केस्ट्रा होता. असं नसताना माझ्या मुलाला आणि पत्नीला बदनाम करायचं प्रयत्न आहे. मी याबद्दल कोर्टात जाणार आहे.
अनिल परब लबाड्या करायचं आणि शासनाला फसवायचं काम करतो. पहिल्यांदा विलेपार्लेच्या प्रेमनगरमध्ये SRA ची योजना सुरू होती. यावेळी परब यांनी 8 हजार लोकांना शाखेत बसून दम दिल. माझ्याकडे त्याचे फोटो आहेत. 8 हजार लोकांना घर खाली करायला लावलं. 9 वर्षांपासून हे लोक मुंबईच्या बाहेर आहेत. पैसे खाण्यासाठी हे केलं. हा नीच माणूस आहे, अशा शब्दांत रामदास कदमांनी टीका केली.