TRENDING:

सुषमा अंधारे आणि आगवणेंकडून आरोपांच्या फैरी, रणजितसिंह निंबाळकरांचं मोठं पाऊल, 50 कोटींची नोटीस धाडली

Last Updated:

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वकील धीरज घाडगे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे आणि आगवणे कुटुंबाला ५० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीची नोटीस पाठवत असल्याचे त्यांनी सांगितले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी, सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या युवती डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विरोधकांनी जोरदार आरोप केले आहेत. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी निंबाळकर यांच्या चौकशीची मागणी केली तसेच आगवणे कुटुंबाने देखील निंबाळकर यांना लक्ष्य केले. याच पार्श्वभूमीवर आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत अंधारे आणि आगवणे कुटुंबाला ५० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीची नोटीस निंबाळकर यांनी वकिलांमार्फत पाठवली आहे.
रणजितसिंह निंबाळकर-सुषमा अंधारे
रणजितसिंह निंबाळकर-सुषमा अंधारे
advertisement

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वकील धीरज घाडगे यांनी पत्रकार परिषद घेतली. घाडगे हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कायदेशीर सल्लागार आहेत. सुषमा अंधारे आणि जयश्री अगवणे यांच्यावर 50 कोटींचा दावा आणि जाहीर लेखी माफी मागावी अशी आम्ही नोटीस पाठवली असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यक्तिक राजकीय अजेंडा राबविण्याचा प्रयत्न

रणजितदादांनी एक रुपया देखील ऊस मुकादमाकडून घेतलेला नाही. तंदुरूस्ती प्रमाणपत्रासंबंधित एकही प्रकरण झालेले नाही. आज अखेर एकही तक्रार रणजित निंबाळकर यांनी मारहाण केलीय म्हणून झालेली नाही. जयश्री आगवणे या मोक्कामधील आरोपी आहेत. त्यांच्यावर 353 चा गुन्हा आहे. दुसरीकडे सुषमा अंधारे वैयक्तिक राजकीय अजेंडा राबवत आहेत, असे निंबाळकर यांचे वकील घाडगे म्हणाले.

advertisement

फलटणमध्ये २१ रणजितसिंह निंबाळकर आहेत

ननावरे नावाच्या व्यक्तीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे आत्महत्या केलीये, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. मात्र ती व्यक्ती माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर नाही, असे त्यांच्या भावाने प्रतिज्ञापत्र दिले आहे. फलटणमध्ये २१ रणजितसिंह निंबाळकर आहेत, असा दावाही धीरज घाडगे यांनी केला.

कारखान्याचा आणि निंबाळकरांचा २०१९ पासून कोणताही संबंध नाही

advertisement

दिगंबर आगवणे विरोधात रणजितसिंह निंबाळकर यांनी एकही गुन्हा दाखल केलेला नाही. 2019 पासून कारखान्याचा आणि रणजितसिंह निंबाळकर यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे ऊस मुकादम आणि त्याला झालेली मारहाण यावरून आमच्यावर बिनबुडाचे आरोप होत आहेत, असे घाडगे म्हणाले.

वेळा बदलीची संधी असून फलटण का मागितले?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

पोलिसांनी युवती डॉक्टरच्या विरोधात 3 तक्रारी केल्या आहेत. जर त्रास होत होता तर तीन वेळा बदलीची संधी असून फलटण का मागितले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सुषमा अंधारे यांनी मयत मुलीच्या घरी जाऊन सहानभूती दाखवायला हवी. रणजितसिंह निबाळकर यांची बदनामी करण्यासाठी सुषमा अंधारे आणि जयश्री आगवणे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली, असे घाडगे म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सुषमा अंधारे आणि आगवणेंकडून आरोपांच्या फैरी, रणजितसिंह निंबाळकरांचं मोठं पाऊल, 50 कोटींची नोटीस धाडली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल