TRENDING:

अंधारे-फडणवीसांची जाहीर माफी पण रामराजेंना इशारा, शेर को धमका सकते है, डरा नहीं सकते!

Last Updated:

RanjeetSinh Naik Nimbalkar: मला लक्ष्य करण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांनीच विरोधकांना माहिती पुरविल्याचा थेट आरोप रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
फलटण : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या आत्महत्येच्या अनुषंगाने होत असलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणमध्ये जाहीर पत्रकार परिषद घेतली. सुषमा अंधारे यांना कुणी वाईट बोलले असेल, त्यांच्याविषयी आमच्या कार्यकर्त्यांपैकी कुणी अपशब्द बोलले असेल तर क्षमा मागतो तसेच माझ्यावरील आरोपांमुळे देवेंद्र फडणवीस यांनाही वाईट शब्दात बोलण्यात आले, त्यांनाही त्रास झाला असेल तर क्षमा याचना करतो, असे रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले. पण त्याचवेळी त्यांनी विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना शेर को धमका सकते है, डरा नहीं सकते, असा इशारा दिला. मला लक्ष्य करण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांनीच विरोधकांना माहिती पुरविल्याचा थेट आरोप रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.
रणजीतसिंह नाईक निंबाळकर
रणजीतसिंह नाईक निंबाळकर
advertisement

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विविध आरोप झाले. त्यांच्या दोन स्वीय सहाय्यकांनी आपल्यावर दबाव टाकले होते, असे डॉक्टर तरुणीने एका तक्रार पत्रात म्हटले होते. आपल्यावर तंदुरुस्ती प्रमाणपत्रे बदलण्यासाठी दबाव असल्याचे डॉक्टर तरुणीने सांगितले होते. हाच धागा पकडून विरोधकांनी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना लक्ष्य केले होते. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी रणजीतसिंह यांना चौकशीच्या कक्षेत घेण्याची मागणी केली होती. गेल्या १० दिवसांपासून शांत असलेल्या रणजीतसिंह निंबाळकर यांनी

advertisement

अखेर आपल्यावरील आरोपांचे खंडन करण्यासाठी फलटणच्या चौकात जाहीर पत्रकार परिषद घेतली.

अंधारे-फडणवीसांची जाहीर माफी पण रामराजेंना इशारा

आपली भगिनी सुषमाताई आज फलटणला आल्या होत्या. लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यांच्याबद्दल कुणी काही चुकीचे बोलले असतील तर त्यांची क्षमा मागतो. फलटणमध्ये बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ६ वर्षांचा सहवास आहे. मी कधीच मला काही पाहिजे म्हणून फडणवीस यांना भेटत नाही. माझ्यामुळे त्यांनाही नावे ठेवली, त्यांना काही सहन करावे लागले असेल तर त्यांचीही माफी मागतो, असे रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.

advertisement

आज माफ करतो रण उद्या सोडणार नाही

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडण्याचं धाडस केलं अन् सुरू केलं केक शॉप, आज मनाली वर्षाला कमावते 24 लाख!
सर्व पहा

माझ्यावर आरोप करणारे मेहबूब शेख, सुषमा अंधारे आणि इतरही लोकांना रामराजे नाईक निंबाळकर यांनीच माहिती पुरवली, असा आरोप रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मी आज माफ करतोय, मात्र उद्यापासून आरोप केले तर सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अंधारे-फडणवीसांची जाहीर माफी पण रामराजेंना इशारा, शेर को धमका सकते है, डरा नहीं सकते!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल