TRENDING:

संताच्या वेशात पापी! कोकरे महाराज अन् शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; खेडमध्ये ‘गुरुकुल’च्या नावाखाली अधर्म

Last Updated:

खेड पोलिसांनी या गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज तसेच शिक्षक प्रितेश प्रभाकर कदम दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिवाजी गोरे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

रत्नागिरी: खेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोटे येथील आध्यात्मिक वारकरी गुरुकुलाच्या प्रमुखावर आणि तेथील शिक्षकावर गुरुकुलात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी या गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज तसेच शिक्षक प्रितेश प्रभाकर कदम दोघांवर  बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा म्हणजेच पोस्को अंतर्गत कलम 12 व 17 प्रमाणे तसेच बी एन एस कायदा कलम 74,351 (3) 85 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

advertisement

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लोटे या ठिकाणी गेल्याच वर्षी गोरगरीब मुले व मुलींसाठी अध्यात्मिक वारकरी गुरुकुल भगवान कोकरे महाराज यांनी सुरू केले होते. त्या ठिकाणी राज्यातील अनेक गोरगरिबांनी निराधार मुलींनी प्रवेश घेतला होता. शालेय शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक वारकरी शिक्षण देण्याचा उद्देश या गुरुकुलाचा होता. मात्र गुरुकुलाच्या प्रमुखावर आणि शिक्षकांवरच गुन्हा दाखल झाल्याने या गोष्टीचा निषेध होत आहे.

advertisement

भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून हीच अपेक्षा, भास्कर जाधवांची संतप्त प्रतिक्रिया

या प्रकरणावर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली. कोकरे महाराज हा भाजपचा पदाधिकारी आहे, भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून हीच अपेक्षा होती? आता मी काय ते पाहतो, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

नागरिकांमध्ये  संतापाची लाट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीसाठी स्टायलिश कुर्तीज, किंमत 300 रुपये,मुंबईतील या मार्केटमध्ये करा खरेदी
सर्व पहा

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये  संतापाची लाट उसळली आहे. गोरगरीब मुलांसाठी सुरू केलेल्या धार्मिक संस्थेतच असे प्रकार घडल्याने अनेकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, गुरुकुल सध्या बंद ठेवण्यात आले असून विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. खेड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संताच्या वेशात पापी! कोकरे महाराज अन् शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; खेडमध्ये ‘गुरुकुल’च्या नावाखाली अधर्म
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल