TRENDING:

गुरुकुलातला महाराज झाला राक्षस, विद्यार्थिनीला मिठी मारून नको तिथे स्पर्श; साधनेच्या नावाखाली विकृती

Last Updated:

माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, अशा नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी पीडित तरुणीने केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिवाजी गोरे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

रत्नागिरी : खेडमधील लोटे येथील आध्यात्मिक वारकरी गुरुकुलमध्ये गुरुकुलच्या प्रमुखानं आणि शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचं समोर आलंय. मुलीनं तक्रार दिल्यानंतर या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.. दरम्यान याप्रकरणी गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज यांना अटक करण्यात आली आहे. तर कोकरे महाराज आणि शिक्षकाला फाशी द्या, अशी मागणी पीडित मुलीने केली आहे.

advertisement

लोटे येथील आध्यात्मिक वारकरी गुरुकुलात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील विनयभंग प्रकरणाने खेड तालुका हादरला आहे. या प्रकरणात गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रीतेश कदम यांच्याविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पीडितेने न्यूज 18 लोकमतशी बोलताना संताप व्यक्त केला आहे. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, अशा नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी पीडित तरुणीने केली आहे.

advertisement

न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार, पिडीतेच्या परिवाराचा निर्धार 

या प्रकरणामुळे जिल्हाभरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, समाजातूनही या आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई आणि फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. वारकरी परंपरेचा मुखवटा लावून चाललेल्या या अधर्मावर आता न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार आहे, असा निर्धारही पिडीतेच्या परिवाराने व्यक्त केला आहे.

advertisement

पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगताना म्हणाली, गुरुकुलमधील पहिले आठ दिवस चांगले गेले. त्यानंतर महाराज खोलीमध्ये एकटी असताना येत असे. त्यांनी मिठी मारली नको तिथे स्पर्श केला. हा प्रकार नेहमीच घडत होता मात्र मी भीतीपोटी कोणालाच सांगत नव्हते. एवढच नाही तर घडलेला प्रकार कोणाला सांगायचा नाही अशी धमकी देखील दिली होती. भावाला संपवण्याची धमकी दिली होती.

advertisement

कोकरे महाराजला  दोन दिवसांची पोलीस कोठडी

गुरुकुलातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात आरोपी असलेले गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रितेश कदम यांना खेड पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

न्यायालय परिसरात मोठी गर्दी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीसाठी स्टायलिश कुर्तीज, किंमत 300 रुपये,मुंबईतील या मार्केटमध्ये करा खरेदी
सर्व पहा

न्यायालयीन कारवाईदरम्यान अचानक भगवान कोकरे महाराज यांना फिट आली, त्यानंतर घटनास्थळीच परिस्थिती गोंधळाची झाली. पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले.या घटनेमुळे न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. संबंधित प्रकरणाबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गुरुकुलातला महाराज झाला राक्षस, विद्यार्थिनीला मिठी मारून नको तिथे स्पर्श; साधनेच्या नावाखाली विकृती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल