रविंद्र धंगेकर यांनी गौतमी पाटील हिच्या कारच्या अपघात प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या चौकशीची माहिती घेतली. पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचे सांगत तत्काळ कारवाई करणे गरजेचे होते, तसेच फोनवरून याला उचला त्याला उचला असे आदेश देणाऱ्या चंद्रकातं पाटील यांनी पोलिसांना भेटून त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती, असे धंगेकर म्हणाले.
ज्यांच्या आजूबाजूला गुन्हेगार फिरतात, त्यांनी ह्याला उचला, त्याला उचला सांगू नये
advertisement
एका ऑफिसमध्ये बसून गौतमीला का उचलले नाही, असे व्हिडीओतून चंद्रकांत पाटील म्हणत असल्याचे पुणेकरांनी पाहिले. त्यांच्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार फिरत असताना ह्याला उचला, त्याला उचला असे त्यांनी सांगू नये. खरेच जर अपघातग्रस्ताला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी थेट पोलिसांना भेटून त्यांच्याशी चर्चा करावी. ऑफिसमध्ये बसून फोन करून, त्याचा व्हिडीओ तयार करून काय होईल? अशी टीका धंगेकर यांनी केली.
रिक्षाला ठोकर देऊन नाचाचे कार्यक्रम सुरू केलेस... धंगेकरांनी गौतमी पाटीलला खडसावले
महाराष्ट्रात गौतमी पाटील यांचे मोठे नाव आहे. ज्यावेळी मोठ्या माणसाकडून अशी चूक होते, त्यावेळी खरे तर त्यांनी माणुसकीच्या नात्याने अपघातग्रस्ताची भेट घेऊन त्यांना मदत करायला हवी. मात्र गौतमी या प्रकरणात अतिशय असंवेदनशीलपणा दाखवला. मदत सोडा, अपघातग्रस्ताची त्यांनी साधी भेटही घेतली नाही. अपघात होईनही गौतमी राज्यात नाचाचे कार्यक्रम सुरू केले. पोलिसांनी या प्रकरणात त्वरित कारवाई करावी. गौतमीच्या चालकाने मद्यपान केले होते का? हे तपासायला हवे. तसेच मागून येऊन गाडीने रिक्षाला धडक दिली असेल तर त्याचा उद्देशही तपासायला हवा, असे धंगेकर म्हणाले.