TRENDING:

रिलायन्स फाऊंडेशनकडून बीड आणि सोलापूरच्या 4000 पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

Last Updated:

सोलापूर आणि बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त ४,००० कुटुंबांना रिलायन्स फाऊंडेशनने अन्न, आरोग्य, जनावरांचे संरक्षण व चारा पुरवठा करत मदतीचा हात दिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
महाराष्ट्रातील सोलापूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांचे जीवन पुन्हा रुळावर आणण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनने एक मोठे आणि सर्वसमावेशक मदत कार्य सुरू केले आहे. या उपक्रमातून पुराचा गंभीर परिणाम झालेल्या ४,००० कुटुंबांना मदत पुरवली जात आहे. हे मदत कार्य प्रामुख्याने जनावरांचे संरक्षण, अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, तसेच सार्वजनिक आरोग्याचे धोके कमी करण्यावर केंद्रित आहे.
News18
News18
advertisement

जनावरांच्या संरक्षणावर विशेष लक्ष

पूर ओसरल्यानंतर जनावरांमध्ये होणाऱ्या संभाव्य जीवघेण्या 'एचएस-बीक्यू' (Haemorrhagic Septicaemia आणि Black Quarter) सारख्या रोगांना प्रतिबंध घालणे अत्यावश्यक असते. याच अनुषंगाने, रिलायन्स फाऊंडेशनने सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने पशुवैद्यकीय शिबिरे आयोजित केली आहेत. पशुसंवर्धन विभागाने केलेल्या जोखीम मूल्यांकनानुसार, फाउंडेशनने सुमारे २२,००० जनावरांसाठी 'एचएस-बीक्यू' लसीकरण उपलब्ध केले आहे. याव्यतिरिक्त, सर्वाधिक बाधित पशुपालकांना जनावरांसाठी चारा (Silage Bags) वितरित केला जात आहे, जेणेकरून त्यांच्या उपजीविकेचे साधन सुरक्षित राहील. बीड जिल्ह्यातही पशुपालकांना वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून मदत केली जाईल.

advertisement

अन्न, स्वच्छता आणि आरोग्य पुरवठा

पुरामुळे सोलापूरमध्ये अनेक कुटुंबांना घराबाहेर किंवा सामूहिक निवाऱ्यांमध्ये राहावे लागले. त्यांच्या अन्न आणि पोषणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनने सामुदायिक स्वयंपाकघरांना (Community Kitchens) ताजे आणि पौष्टिक जेवण बनवण्यासाठी आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला. पुरामुळे पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने, बाधित गावांमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन उपक्रमही सुरू करण्यात आला आहे. फाऊंडेशन पुरामुळे खराब झालेल्या सामुदायिक पाणी फिल्टर प्रणाली दुरुस्त करून पूर्ववत करण्याचे काम करत आहे.

advertisement

पाणीजन्य आजारांना प्रतिबंध

घरोघरी स्वच्छता आणि आरोग्याचे किट (Hygiene and Sanitation Kits) पोहोचवले जात आहेत. यामध्ये वैयक्तिक आणि मासिक पाळीतील स्वच्छतेच्या वस्तूंव्यतिरिक्त ओरल रिहायड्रेशन सॉल्ट्स (Oral Rehydration Salts) चा समावेश आहे, ज्यामुळे कुटुंबांना आरोग्य राखता येईल आणि पाणीजन्य आजारांना प्रतिबंध करता येईल. रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, "मध्य महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील नुकसानीमुळे आम्ही व्यथित आहोत आणि सोलापूर व बीड येथील पूरग्रस्त कुटुंबांना या कठीण परिस्थितीतून बाहेर पडून पुन्हा आपले जीवन उभे करण्यासाठी मदत करण्यास आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत."

advertisement

संकटकाळी राष्ट्रासोबत रिलायन्स

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीत लक्ष्मीपूजनला या चुका टाळा! अन्यथा आयुष्यभर पस्तवाल, गुरुजींनी सांगितलं
सर्व पहा

रिलायन्स नेहमीच देशाच्या अत्यंत कठीण परिस्थितीत मदतीसाठी उभे राहिले आहे. यापूर्वी पंजाब, आसाम आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये आलेल्या पुराच्या वेळी रिलायन्सने तत्परता दाखवून ग्राउंड स्तरावर काम केले. या प्रयत्नांमुळे केवळ वेळेवर मदत मिळत नाही, तर पूरग्रस्त समुदायांना शक्ती आणि आशेने पुन्हा उभे राहण्यास मदत मिळते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रिलायन्स फाऊंडेशनकडून बीड आणि सोलापूरच्या 4000 पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल