Diwali 2025: दिवाळीत लक्ष्मीपूजनला या चुका टाळा! नाहीतर आयुष्यभर पस्तवाल, गुरुजींनी सांगितलं शास्त्र
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Diwali 2025: यंदा 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे. या काळात ‘शुभ, लाभ आणि अमृत’ हा योग असल्याने याच वेळेत पूजन करणं अत्यंत शुभ मानलं जातं.
मुंबई : दिवाळी हा पाच दिवसांचा सण म्हणजे आनंद, उजळण आणि शुभकार्यांचा सोहळा. या पाच दिवसांपैकी लक्ष्मीपूजनाचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी घरातील धन, धान्य आणि संपत्तीची पूजा करून श्री लक्ष्मीचे आगमन आणि स्थैर्य मिळवण्याची प्रार्थना केली जाते. परंतु अनेक वेळा आपण कितीही विधिवत पूजा केली तरीही नकळत काही चुका घडतात, ज्या लक्ष्मी आगमनात अडथळा निर्माण करू शकतात. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात, याबद्दल आदित्य जोशी गुरुजींनी लोकल 18 सोबत बोलताना सविस्तर माहिती दिलीये.
यंदा 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे. या काळात ‘शुभ, लाभ आणि अमृत’ हा योग असल्याने याच वेळेत पूजन करणं अत्यंत शुभ मानलं जातं. गुरुजींनी सांगितलं की, “लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी संध्याकाळच्या वेळी शमी, पिंपळ किंवा आवळ्याच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा, यामुळे घरात लक्ष्मीचं वास्तव्य टिकून राहतं.”
advertisement
या गोष्टी टाळा
घरातील झाडू उभा ठेवू नये, तो नेहमी आडवा ठेवावा. कारण झाडू म्हणजे घरातील लक्ष्मीचं प्रतीक आहे.
सायंकाळच्या वेळी भोजन, भांडी धुणे किंवा झोपणे टाळावे, कारण हीच वेळ लक्ष्मी आगमनाची असते.
advertisement
सायंकाळी भांडण, राग किंवा तणावपूर्ण वातावरण निर्माण करू नये, कारण त्या वेळेस घरात शांतता आणि प्रसन्नता राखली तर सातही लक्ष्मींचं आगमन होतं.
गुरुजींनी सांगितले की , “सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेत घरात आनंदी आणि स्वच्छ वातावरण ठेवलं, तर श्री लक्ष्मी सदैव घरात नांदते.”
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2025 2:27 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Diwali 2025: दिवाळीत लक्ष्मीपूजनला या चुका टाळा! नाहीतर आयुष्यभर पस्तवाल, गुरुजींनी सांगितलं शास्त्र