'तो तुमची काळजी घेईल...', पंकज धीर यांच्या निधनाआधीच मुलाने केली होती विचित्र पोस्ट, नेटकऱ्यांना पडलाय प्रश्न

Last Updated:

Panjak Dheer Death : अभिनेता निकितिन धीरने वडील पंकज धीर यांच्या मृत्यूच्या काही तास आधी केलेली एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट सध्या सोशल मीडियावर वादळासारखी व्हायरल होत आहे.

News18
News18
मुंबई : 'महाभारत' मालिकेतील 'कर्ण' या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या दुर्दैवी घटनेनंतर त्यांचे पुत्र आणि अभिनेता निकितिन धीर यांनी वडिलांच्या मृत्यूच्या काही तास आधी केलेली एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट सध्या सोशल मीडियावर वादळासारखी व्हायरल होत आहे. या पोस्टला लोक वडिलांच्या निधनाची चाहूल म्हणत आहेत.

निकितिनला आधीच लागली होती वडिलांच्या निधनाची चाहूल

पंकज धीर यांच्या निधनाची बातमी समोर येताच, निकितिन धीर यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा सुरू झाली. निकितिन यांनी वडिलांच्या निधनापूर्वी जवळपास १३ तास आधी, म्हणजेच मध्यरात्री १ वाजता, ही पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये निकितिन धीर यांनी लिहिले होते, "जो समोर येत आहे, त्याला येऊ द्या. जे समोर आहे, त्याला राहू द्या. आणि जे गेलं, त्याला जाऊ द्या. शिवार्पणम म्हणा आणि पुढे जात राहा, तो तुमची काळजी घेईल."
advertisement
वडिलांच्या मृत्यूच्या काही तास आधीच निकितिन यांनी केलेली ही रहस्यमय पोस्ट पाहून चाहते आणि नेटिझन्स हळहळले आहेत. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, निकितिन धीर यांना कदाचित वडिलांच्या परिस्थितीचा किंवा अनपेक्षित घटनेचा आधीच अंदाज आला असावा.

चाहत्यांनी केले निकितिनचे सांत्वन

advertisement
एका चाहत्याने लिहिले, "निकितिनला आधीच कळले होते की काहीतरी वाईट होणार आहे." तर दुसऱ्या युजरने भावूक होत म्हटले, "एका मुलासाठी अशी गोष्ट बोलणे किती कठीण असेल आणि त्याने हे बोलण्यापूर्वी मन किती कठोर केले असेल!" वडिलांचे जाणे हा मुलासाठी सर्वात मोठा धक्का असतो, अशा अनेक भावनिक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत.
advertisement
'महाभारत'मधील कर्णाच्या भूमिकेमुळे पंकज धीर यांनी खूप लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतील एका दमदार कलाकाराला मुकल्याची भावना व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'तो तुमची काळजी घेईल...', पंकज धीर यांच्या निधनाआधीच मुलाने केली होती विचित्र पोस्ट, नेटकऱ्यांना पडलाय प्रश्न
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement