BJP: भाजप मंत्रिमंडळात मोठे फेरबदल;10 नवीन चेहऱ्यांना संधी, दिवाळीपूर्वी बदलाची शक्यता
- Published by:Prachi Amale
Last Updated:
गुजरातच्या मंत्रिमंडळात फेरबदल या आठवड्यातच पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवी दिल्ली : गुजरातमध्ये भाजपच्या मंत्रिमंडळात मोठे बदल होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 10 नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. हा फेरबदल या आठवड्यातच पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात याचा काही परिणाम झाला होता हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, नाव न सांगण्याच्या अटीवर या नेत्याने सांगितले की, आगामी मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलात सध्याच्या मंत्रिमंडळातील जवळपास निम्म्या मंत्र्यांची बदली होण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळात सध्या मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह 17 मंत्री आहेत. त्यापैकी आठ कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत.
गुजरात मंत्रिमंडळ विस्तार 18 ऑक्टोबरपूर्वी होण्याची शक्यता
सध्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांची बदली होण्याची शक्यता आहे. 18 ऑक्टोबरपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल होऊ शकतात. या विस्तारानंतर गुजरातला 10 नवीन मंत्री मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर येत आहे. जगदीश विश्वकर्मा हे गुजरात भाजपचे अध्यक्ष आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला गुजरात सरकारमधील राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांना केंद्रीय मंत्री सीआर पाटील यांच्या जागी भारतीय जनता पक्षाच्या गुजरात युनिटचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. भूपेंद्र पटेल दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. 182 सदस्य संख्या असणाऱ्या गुजरात विधानसभेत जास्तीत जास्त 27 मंत्री असू शकतात. भूपेंद्र पटेल यांनी 12 डिसेंबर 2022 रोजी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
advertisement
कोणाला मिळणार संधी?
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी यांची गुजरातच्या नेत्यांसोबत सुमारे पाच तास बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळात मोठा बदल होऊ शकतो. मंत्रिमंडळात 10 नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभेचे अध्यक्ष शंकरभाई चौधरी यांना सरकारमध्ये मोठी जबाबदारी देण्याची चर्चा आहे. या मंत्रिमंडळात दोन महिला नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे, ज्यात क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी आमदार रिवाबा जडेजा यांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झाल्यानंतर आमदार झालेले अर्जुन मोधवाडिया आणि सीजे चावडा हे देखील मंत्री होण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
October 15, 2025 7:26 PM IST
मराठी बातम्या/देश/
BJP: भाजप मंत्रिमंडळात मोठे फेरबदल;10 नवीन चेहऱ्यांना संधी, दिवाळीपूर्वी बदलाची शक्यता