Ruturaj Gaikwad : 0,0,0,0... पृथ्वी शॉ ते कॅप्टन सगळ्यांचं बदक, पण एकटा नडला ऋतुराज, महाराष्ट्राची लाज वाचवली!

Last Updated:

टॉप-5 पैकी 4 जण शून्य रनवर आऊट झाले, टीमची अवस्था 18 रनवर 5 विकेट अशी झाली, पण ऋतुराज गायकवाडने किल्ला लढवून महाराष्ट्राला अडचणीतून बाहेर काढलं आहे.

0,0,0,0... पृथ्वी शॉ ते कॅप्टन सगळ्यांचं बदक, पण एकटा नडला ऋतुराज, महाराष्ट्राची लाज वाचवली!
0,0,0,0... पृथ्वी शॉ ते कॅप्टन सगळ्यांचं बदक, पण एकटा नडला ऋतुराज, महाराष्ट्राची लाज वाचवली!
थिरुवनंतपूरम : टॉप-5 पैकी 4 जण शून्य रनवर आऊट झाले, टीमची अवस्था 18 रनवर 5 विकेट अशी झाली, पण ऋतुराज गायकवाडने किल्ला लढवून महाराष्ट्राला अडचणीतून बाहेर काढलं आहे. रणजी ट्रॉफीच्या मोसमाला आजपासून सुरूवात झाली आहे. केरळविरुद्ध मोसमाच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या अर्ध्या तासामध्येच महाराष्ट्राची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. पृथ्वी शॉ, अर्शिन कुलकर्णी, सिद्धेश वीर आणि कर्णधार अंकित बावणे शून्य रनवर आऊट झाले, पण त्यानंतर ऋतुराजने 91 रनची झुंजार खेळी केली.
ऋतुराज गायकवाडने 151 बॉलमध्ये 91 रन केले, ज्यात 11 फोरचा समावेश होता. सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या जलज सक्सेनाने 49 रनची खेळी केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा महाराष्ट्राचा स्कोअर 179/7 असा झाला आहे. विकी ओत्सवाल 10 रनवर आणि रामकृष्णा घोष 11 रनवर खेळत आहे.
केरळकडून एमडी निधीशने 4 विकेट घेतल्या तर बसिलला 2 आणि एडन ऍपल टॉमला 1 विकेट मिळाली. रणजी ट्रॉफीच्या या मोसमाआधी पृथ्वी शॉने मुंबईची साथ सोडली आणि तो महाराष्ट्राच्या टीममध्ये आला, पण मोसमाच्या पहिल्याच सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये पृथ्वी शॉकडून घोर निराशा झाली. 4 बॉल खेळल्यानंतर पृथ्वी शॉ एकही रन न करता पॅव्हेलियनमध्ये परतला. एमडी निधीशने पृथ्वी शॉला एलबीडब्ल्यू केलं.
advertisement

सराव सामन्यात शतक

पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफी आधी मुंबईविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात शतक झळकावलं होतं, पण या शतकानंतर पृथ्वीने मुंबईचा खेळाडू मुशीर खानसोबत पंगा घेतला. पृथ्वी शॉने मुशीरची कॉलर पकडून त्याला बॅटने मारहाण केल्याची घटना घडली, यानंतर पृथ्वीने मुशीरची माफी मागितली होती.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉने 181 रनची खेळी केली, यानंतर मुशीर खानने पृथ्वीला आऊट केलं. पृथ्वीची विकेट घेतल्यानंतर मुशीर त्याला हात जोडून थँक्यू म्हणाला, यावरून पृथ्वी शॉला राग आला आणि त्याने मुशीरची कॉलर पकडून त्याला बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. अखेर अंपायरनी पृथ्वी आणि मुशीर यांच्यातला वाद सोडवला.
advertisement

रणजी ट्रॉफीसाठी महाराष्ट्राची टीम

अंकित बावणे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, अर्शीन कुलकर्णी, सिद्धेश वीर, सौरभ नवले (विकेटकीपर), मंदार भंडारी (विकेट कीपर), जलज सक्सेना, विकी ओस्तवाल, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, प्रदीप दधे, हितेश वाळुंज, सिद्धार्थ म्हात्रे, हर्षल काटे, रजनीश गुरबानी
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ruturaj Gaikwad : 0,0,0,0... पृथ्वी शॉ ते कॅप्टन सगळ्यांचं बदक, पण एकटा नडला ऋतुराज, महाराष्ट्राची लाज वाचवली!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement