Guru Gochar 2025: प्रयत्नांना आता यश येणार! धनत्रयोदशीच्या रात्री मोठ्या ग्रहाचे गोचर 3 राशींना लकी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Guru Gochar 2025: १८ ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी केली जाईल. या दिवशी बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. धनत्रयोदशीला सोने-चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी केल्यास भगवान धन्वंतरी आणि कुबेर महाराजांची कृपा होते, असे म्हटले जाते. यंदा धनत्रयोदशीचा सण खूप खास असणार आहे. कारण धनत्रयोदशीच्या रात्री देवगुरू बृहस्पती कर्क राशीत गोचर करणार आहे.
द्रिक पंचांगनुसार, कार्तिक कृष्ण त्रयोदशी तिथी १८ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजून १८ मिनिटांपासून सुरू होऊन १९ ऑक्टोबरला दुपारी ०१ वाजून ५१ मिनिटांपर्यंत असेल. १८ ऑक्टोबरला धनत्रयोदशीचा सण साजरा झाल्यानंतर मध्यरात्री ०३ वाजून ०९ मिनिटांनी सर्वात मोठा ग्रह बृहस्पति (गुरू) कर्क राशीत गोचर करेल. हे गोचर चार राशींना लाभ देईल.
advertisement
मेष - नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला असेल. तुम्हाला कार्यस्थळी मोठी जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी राहतील. तुम्ही ज्या संधीची बऱ्याच काळापासून वाट पाहत होता, ती तुम्हाला लवकरच मिळू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबासोबत धार्मिक यात्रेला जाण्याची संधी मिळू शकते.
advertisement
कर्क - नवीन नोकरी किंवा रोजगार शोधत असलेल्या लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. रोग-विकारांपासून मुक्ती मिळेल. धनाची बचत होईल आणि उत्पन्नाच्या साधनांमधून पुरेसे धन मिळेल. या काळात तुम्ही उत्साही आणि ऊर्जा अनुभवाल. घर-परिवारातील वृद्ध व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील. कुटुंबात कोणती मोठी आनंदाची बातमी येऊ शकते.
advertisement
धनु - व्यापारी वर्गातील लोकांना खूप लाभ होईल. कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळेल. भविष्यात घर, गाडी, जमीन किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता दिसत आहे. या काळात खरेदी केलेल्या वस्तूंचा लाभ दीर्घकाळ मिळेल. गुप्त स्रोतांंमधून धनप्राप्ती होईल. आई-वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. खर्चात कपात झाल्यामुळे मन आनंदी होईल.
advertisement
मीन रास - नवीन व्यवसाय किंवा काम सुरू करण्यासाठी वेळ चांगला आहे. माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची विशेष कृपा होईल. अचानक धन प्राप्त होईल. खर्चात कपात होईल. बँक-बॅलन्स वाढेल. मानसिक चिंता दूर होऊ शकतात. शिक्षण घेत असलेल्या लोकांची एकाग्रता चांगली राहील आणि सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)