Dhanatrayodashi 2025: धनत्रयोदशी म्हणजे काय? जाणून घ्या महत्त्व; अशी आहे कथा
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
Dhanteras 2025: धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धनोतरी, देवी लक्ष्मी, भगवान कुबेर यांची पूजा आणि आराधना केली जाते. धन आणि त्रयोदशी या दोन शब्दापासून बनलेली धनत्रयोदशी म्हणजे त्रयोदशीची तिथी जी संपत्ती देते जेव्हा धनाची पूजा केली जाते धनाची मनोकामना पूर्ण होते.
धनतेरस आपण ज्याला धनत्रयोदशी (मराठीमध्ये धनत्रयोदशी) किंवा धन्वंतरी त्रयोदशी असेही म्हटले जाते. हा भारतातील दिवाळी सणाचा पहिला दिवस असतो. तर, याचदिवशी नेपाळमध्ये तिहारचा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धनोतरी, देवी लक्ष्मी, भगवान कुबेर यांची पूजा आणि आराधना केली जाते. धन आणि त्रयोदशी या दोन शब्दापासून बनलेली धनत्रयोदशी म्हणजे त्रयोदशीची तिथी जी संपत्ती देते जेव्हा धनाची पूजा केली जाते धनाची मनोकामना पूर्ण होते.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने, चांदी आणि भांडी इत्यादी खरेदीचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, यामुळे संपत्तीचा देव कुबेर प्रसन्न होतो आणि आपल्यावर धनाचा वर्षाव होतो. त्याशिवाय दिवाळीत झाडू खरेदी करण्यालाही विशेष महत्त्व आहे. तसेच हिंदू धर्मात धनत्रयोदशीला झाडू खरेदी करण्याची फार पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. झाडूला संपत्ती, समृद्धी आणि लक्ष्मीचे रूप मानले जाते. झाडू हे घरातील दारिद्र्य, वाईट आणि नकारात्मक गोष्टी काढून टाकण्याचे प्रतीक आहे. या दिवशी झाडू खरेदी केल्याने घरात सुख- शांती येते आणि संपत्ती वाढते.
advertisement
त्याशिवाय घरातून गरिबीही दूर होते. दिवाळीला झाडू खरेदी करण्याबाबत आणखी एक असा समज आहे की, असे केल्याने लक्ष्मी घरातून बाहेर पडत नाही. यासोबतच काही लोकांचा असाही विश्वास आहे की, या दिवशी घरात झाडू आणल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मकता पसरते. पौराणिक कथेनुसार कार्तिक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला समुद्र मंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. यामुळेच या तिथीला धनत्रयोदशी या नावाने ओळखले जाते. म्हणूनच या तिथीला भांडी खरेदी करण्याची परंपरा चालत आलेली आहे.
advertisement
पौराणिक कथेनुसार कार्तिक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला समुद्र मंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. यामुळेच या तिथीला धनत्रयोदशी या नावाने ओळखले जाते. म्हणूनच या तिथीला भांडी खरेदी करण्याची परंपरा चालत आली आहे.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
October 15, 2025 7:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dhanatrayodashi 2025: धनत्रयोदशी म्हणजे काय? जाणून घ्या महत्त्व; अशी आहे कथा