नोकरी गेली, अश्विनी यांनी सुरू केला ब्रँड, महिन्याला पगारापेक्षा जास्त कमाई
रेल्वे मंत्रालय अंतर्गत केल्या जाणाऱ्या नोकरभरतीमध्ये एकूण 27 जागांसाठी नोकरभरती होणार आहे. क्यूए/क्यूसी तज्ञ, मेकॅनिकल अभियंता, इलेक्ट्रिकल अभियंता, व्यवस्थापन तज्ञ आणि सहाय्यक स्थापत्य अभियंता अशा वेगवेगळ्या पदांसाठी ही नोकरभरती केली जाणार आहे. क्यूए/क्यूसी तज्ञ आणि सहाय्यक स्थापत्य अभियंता पदासाठी 12 जागांची भरती केली जाणार आहे. तर, मेकॅनिकल अभियंता, इलेक्ट्रिकल अभियंता आणि व्यवस्थापन तज्ञ पदासाठी प्रत्येकी एका पदासाठी नोकरभरती होणार आहे. 16 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या ह्या ऑनलाईल भरती प्रक्रियेची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर आहे. शिवाय, रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत केल्या जाणाऱ्या नोकरभरतीच्या मुलाखतीची घोषणा केली.
advertisement
200 वर्षांचा पेशवेकालीन इतिहास, पुण्यातील या पेठेत आहे ऐतिहासिक कालिका मंदिर
अर्जदाराचे वय किमान 55 वर्षापर्यंत असण्याची गरज आहे. अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना 5 वर्षांची वयाची सूट आणि इतर मागासवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची वयाची सूट असणार आहे. शिवाय, त्याला संबंधित क्षेत्रामध्ये किमान 12 वर्षांच्या अनुभवाची गरज आहे. परीक्षा घेतली जाणार नसून थेट मुलाखतीच्या माध्यमातून अर्जदारांची निवड केली जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाची इंजिनियर पदासाठीची थेट मुलाखत 13 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबरपर्यंत घेतली जाणार आहेत. तर, 10 ऑक्टोबरला हॉलतिकिट अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करता येणार आहे. मुलाखतीचे ठिकाण गुजरात असणार आहे. क्यूए/क्यूसी तज्ञ, मेकॅनिकल अभियंता, इलेक्ट्रिकल अभियंता आणि व्यवस्थापन तज्ञ पदासाठी 30,000 ते 1,20,000 इतका पगार उमेदवाराला मिळणार आहे. तर, सहाय्यक स्थापत्य अभियंता पदासाठी 27, 869 ते 50, 721 इतका पगार उमेदवाराला मिळणार आहे.