आता या प्रकरणात पीएमएलए कोर्टानं रोहित पवारांना जामीन मंजूर केला आहे. या रोहित पवारांना सर्वात मोठा दिलासा मानला जातोय. कारण मागच्या काळात रोहित पवारांनी घेतलेल्या भूमिका पाहता, रोहित पवारांच्या या प्रकरणात अडचणी वाढू शकतात, असं बोललं जात होतं. मात्र कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला आहे.
रोहित पवारांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार म्हणाले की, या प्रकरणातील एफआयआर मध्ये अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 75 नेत्यांची नावे आहे. माझ्या वेळी तिथे प्रशासक होते. राजकीय बोर्ड नसताना जी मी जास्त भावाने फॅक्टरी घेतली. मी सरकारविरोधात बोलत असल्याने ईडीकडून माझ्यावर कारवाई करण्यात आली. ईडीचे अधिकारी कुठेही चुकीचे नाही. त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याने ते वागत आहे.
advertisement
रोहित पवार पुढे म्हणाले की, चार्जशीटला विरोध करण्यासाठी आम्ही न्याय व्यवस्थेकडे आलो आहोत. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याने नक्कीच आमचा विजय होईल. चौथ्यांदा हे टेंडर आले होते, त्यामध्ये एकापेक्षा अधिक व्यक्तीने त्यात सहभागी व्हावे असे काही त्यामध्ये नमूद केलेले नव्हते. जेव्हा प्रशासक आले तेव्हा त्यांनी रेट वाढवला आणि वाढलेल्या रेटला मी कारखाना घेतलेला आहे. ईडीने केलेले आरोप हे हवेतील आहेत.
