TRENDING:

5 हजार कोटींचा घोटाळा, महायुतीचा आणखी एक नेता अडकणार, रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी आणखी एका नेत्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी तब्बल ५००० कोटींचा घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मागील काही दिवसांपासून महायुतीचे विविध मंत्री आणि आमदार यांची विविध वादग्रस्त प्रकरणं समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वी राज्याचे तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात रम्मी खेळताना आढळून आले होते. त्यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ रोहित पवार यांनी समोर आणला होता. यानंतर त्यांना कृषीमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर संजय शिरसाट, मंत्री योगेश कदम यांच्यावर देखील विविध गंभीर आरोप झाले. आता रोहित पवारांनी आणखी एका नेत्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी तब्बल ५००० कोटींचा घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
News18
News18
advertisement

रोहित पवार आज सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन या भ्रष्टाचाराचा खुलासा करणार आहेत. त्यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहून याबाबतची माहिती दिली आहे. संबंधित पोस्टमध्ये त्यांनी 'गँग्ज ऑफ गद्दार' असा उल्लेख केला आहे. त्यामुळे कथित ५००० कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात एकनाथ शिंदे गट अथवा अजित पवार गटातील नेता किंवा मंत्री असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण रोहित पवारांनी उल्लेख केलेला नेता कोण? हे पुढच्या काही तासांत स्पष्ट होणार आहे.

advertisement

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

रोहित पवार एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले की, मातृभूमीशी गद्दारी करुन इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या वारसदारांच्या घशात ५ हजार कोटींचा मलिदा… वर्तमानातील गद्दारांची इतिहासातल्या गद्दारांशी हातमिळवणी. ‘गँग्ज ऑफ गद्दार’चा पर्दाफाश करण्यासाठी भेटू (सोमवार) पत्रकार परिषदेत, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. मुंबईच्या बॅलार्ड इस्टेट येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात होणार आहे.

advertisement

खरं तर, मागील काही दिवसांपासून रोहित पवार राजकारणात चांगलेच अॅक्टीव्ह झाले आहेत. ते थेट अजित पवारांना देखील शिंगावर घेताना दिसत आहेत. अशात त्यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहून खळबळ उडवली आहे. दरम्यान, रोहित पवार आणि अजित पवार यांच्यात सांगलीतील एका कार्यक्रमात चांगलीच जुगलबंदी रंगली होती. रोहित पवारांनी अजित दादांना भावकीची आठवण करुन दिल्यानंतर काका अजित पवारांनीही शेलक्या शब्दात रोहित पवारांचा समाचार घेतला. तसेच, मी भावकी जपली म्हणून तू आमदार झाला, माझ्या नादी लागू नको, अशा शब्दात इशाराही दिला होता. त्यानंतर, आता रोहित पवारांनी आणखी एका मंत्र्याला लक्ष्य केल्याने हे मंत्री महोदय कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
5 हजार कोटींचा घोटाळा, महायुतीचा आणखी एक नेता अडकणार, रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल