याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ओला आणि उबरसारखे अॅप प्रत्यक्ष चालकांना एका किलोमीटरसाठी 8 ते 9 रुपये देतात. इतर वाहतूक खर्च जास्त असल्याने चालकांचं यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं होतं. याबाबत अॅप आधारित टॅक्सी चालकांनी संप केले, आंदोलने केली आणि शासनाशी पत्रव्यवहार देखील केला होता. फक्त चालकांचीच नाहीतर या कंपन्यांकडून प्रवाशांची देखील आर्थिक लूट होत होती.
advertisement
Navratri 2025: महालक्ष्मी पावली! नवरात्रीत या मार्गांवर धावणार बेस्टच्या विशेष बस
त्यामुळे आता अॅग्रीगेटर्स देखील सामान्य रिक्षा आणि कॅब यासाठी आरटीओने निश्चित केलेले दर लागू होणार आहेत. साध्या टॅक्सीसाठी प्रतिकिलोमीटर 20.66 रुपये आणि एसी टॅक्सीसाठी प्रतिकिलोमीटर 22.72 रुपये दर असेल. या दरांचं पालन न केल्यास परिवहन विभागाद्वारे कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
ओला, उबर, रॅपिडो कंपन्यांना प्रत्येक वाहन फेरीद्वारे गोळा केलेल्या भाड्याच्या किमान 80 टक्के रक्कम चालकांना देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. हॅचबॅक गाड्यांसाठी प्रतिकिलोमीटर 28 रुपये, सेडान गाड्यांसाठी प्रतिकिलोमीटर 31 रुपये आणि एसयुव्ही म्हणजेच मोठ्या गाड्यांसाठी प्रतिकिलोमीटर 34 रुपये आकारण्याची परवानगी आहे. कंपन्यांनी हे नियम न पाळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.