TRENDING:

मेधा कुलकर्णींच्या पप्पांचा शनिवारवाडा नाही, खासदार असूनही कायद्याची अक्कल नाही, रुपाली पाटील संतापल्या

Last Updated:

मुस्लीम महिलांनी शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याचा आरोप करून त्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना महायुतीतूनच विरोध होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : केवळ हिंदू धर्मियांनाच शनिवारवाड्यात प्रवेश द्या, अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली. खासदार असूनही त्यांना कायद्याची अजिबात अक्कल नाही. मेधा कुलकर्णी यांच्या पप्पांचा शनिवारवाडा नाही. पुण्यात हिंदू मुस्लीम बांधव अत्यंत गुण्यागोविंदाने नांदत आहेत. जातीजातीत तेढ निर्माण करणाऱ्या कुलकर्णी यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा पुणे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला.
रुपाली पाटील-मेधा कुलकर्णी
रुपाली पाटील-मेधा कुलकर्णी
advertisement

मुस्लीम महिलांनी शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याचा आरोप करून त्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना महायुतीतूनच विरोध होत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी शनिवारवाडा दुमदुमून गेला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

advertisement

कोण कट्टर हिंदू याचे प्रमाणपत्र वाटण्याचा अधिकार मेधा कुलकर्णी यांना नाही

आमचा संघर्ष भाजपशी नसून मेधा कुलकर्णी यांच्याशी आहे. त्या खासदार आहेत परंतु त्यांना कायद्याची कोणतीही जाण नाही. त्या स्वत:ला कट्टर हिंदुत्ववादी मानतात परंतु आम्ही त्यांच्यासारखे हिंदू नाही जे जातीजातीत भांडणे लावतील, द्वेषपूर्ण वातावरण करतील. कोण कट्टर हिंदू याचे प्रमाणपत्र वाटण्याचा अधिकार मेधा कुलकर्णी यांना दिलेला नाही आणि शनिवारवाडा त्यांच्या बाबांचा नाही, असे रुपाली पाटील म्हणाल्या.

advertisement

सौभाग्याचे लेणे म्हणजे हिरवा रंग, मग हिरव्याचा द्वेष का?

मुस्लीम महिलांनी शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याचा व्हिडीओ कुलकर्णी यांनी ट्विट केला. तो व्हिडीओ कधीचा आहे हे माहिती नाही. परंतु तो व्हिडीओ खरा आहे हे आपण मानायचे झाले तर नमाज पठण केल्याने कोणता धोका निर्माण झालाय, असा सवाल रुपाली पाटील यांनी केला. हिंदू धर्मियांमध्ये सौभाग्याचे लेणे म्हणजे हिरवा रंग, मग हिरव्याचा द्वेष का? असेही रुपाली पाटील यांनी विचारले.

advertisement

शनिवारवाड्याच्या पुढे असलेल्या मजारीची नोंद १९३६ मध्ये पुरातत्व विभागाकडे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात गाईचे तूप आरोग्यासाठी फायदेशीर, त्वचा राहील तजेलदार,आणखी हे फायदे पाहा
सर्व पहा

शनिवारवाड्याच्या पुढे असलेल्या मजारीची नोंद १९३६ मध्ये पुरातत्व विभागाकडे असल्याचे सांगत मेधा कुलकर्णी यांना केवळ हिंदू मुस्लीम वाद निर्माण करायचा आहे, असा गंभीर आरोप पाटील यांनी केला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मेधा कुलकर्णींच्या पप्पांचा शनिवारवाडा नाही, खासदार असूनही कायद्याची अक्कल नाही, रुपाली पाटील संतापल्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल