TRENDING:

रुपाली ठोंबरेंचं अखेर ठरलं! 2005 चा फोटो शेअर करत दिले संकेत; म्हणाल्या #साम_दाम_दंड_भेद

Last Updated:

रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत साम-दाम- दंड- भेद असे म्हणत असे सूचक वक्तव्य केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये काही दिवसांपूर्वी रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये कमालीचा वाद पेटला होता. दोन्ही महिलांमध्ये नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला होता. पण, त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रुपाली ठोंबरे यांना काही दिवसांपूर्वी पक्षाच्या विविध पदांचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादीत रुपाली ठोंबरे अस्वस्थ असून त्यामुळे रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी सोडणार अशी चर्चा रंगली होती, त्यातच आता रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत साम-दाम- दंड- भेद असे म्हणत असे सूचक वक्तव्य केले आहे.
News18
News18
advertisement

राज्य महिला आ.योगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर थेट टीकास्त्र सोडल्यामुळे चांगलाच वाद पेटला होता. अखेरीस राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रुपाली ठोंबरे यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्याकडून या प्रकरणावर खुलासा मागवण्यात आला आहे. एवढंच नाहीतर नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून रुपाली ठोंबरेंना वगळण्यात आलं होतं.  त्यामुळे रुपाली ठोंबरे या पक्षाच्या कृत्यावर कमालीच्या नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आज केलेल्या पोस्टनंतर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. रुपाली ठोंबरे यांनी फेसबुकवर दोन फोटो शेअर केले आहे. एक फोटो शरर पवार यांच्यासोबतचा आणि दुसरा फोटो शरद पवार आणि बाळासाबेह ठाकरे यांचा एकत्रित फोटो आहे. हे फोटो भविष्यातील राजकीय वाटचालीचे संकेत तर नाही ना, अशी चर्चा रंगली आहे.

advertisement

रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, पहिला फोटो 2005 मधील आहे बरं का? तेव्हा पासून समाजात,राजकारणात स्वतःच्या जीवावर मनगटाच्या ताकदीवर कामाच्या जोरावर काम करण्यास सुरुवात केली दुसरा फोटो महाराष्ट्रातील ज्येष्ठ,दिग्गज नेते,जबरदस्त आवडते नेते हिंदुरुदय सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे व मा. शरदचंद्र पवार साहेब. त्यामुळे आयरे गेरे नथू खैरे,नटरंगी लोकांनी शिकवू नयेच. #साम_दाम_दंड_भेद.

advertisement

नेमकं कोणत्या पक्षात जाणार? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात तुमचे ओठ फुटतात? हे करा घरगुती उपाय, सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

रुपाली ठोंबरे यांनी शरद पवार यांच्यासोबत आपला एक फोटो पोस्ट केला आहे, तर दुसऱ्या फोटोत शरद पवार आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एकत्रित फोटो आहे. दोन्ही फोटोत शरद पवार यांचा समावेश असल्याने रुपाली ठोंबरे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. तर दुसरीकडे रुपाली ठोंबरे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. मात्र श्रीकांत शिंदेंची भेट ही खाजगी कामासाठी भेट होती, असं स्पष्टीकरण रुपाली ठोंबरे यांनी दिलं होतं. मात्र आज शेअर केलेल्या फोटोवरून पुन्हा त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा अंदाज वर्तवला जात आहे. फोटोवरून फक्त चर्चा सुरू असून नेमका कोणत्या पक्षात जाणार याविषयी अद्याप कोणतेही स्पष्टता आली नाही

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रुपाली ठोंबरेंचं अखेर ठरलं! 2005 चा फोटो शेअर करत दिले संकेत; म्हणाल्या #साम_दाम_दंड_भेद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल