संभाजी नगरच्या लाडसावंगी सय्यदपुर येथे ही घटना घडली आहे. सय्यदपुर येथील कोमल अजय सिरसाठ यांना अचानक प्रसुतीवेदना सूरू झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना तत्काळ रूग्णालयात नेणे गरजेचे होते. पण गावातील पुलचं पावसामुळे वाहून गेल्याने गर्भवतीला प्रसुतीसाठी नेमकं न्यायचं कसं असा प्रश्न सिरसाठ कुटुंबियांना पडला होता.तसेच गावात पुराचे पाणी साचल्याने कोणत्याच वाहनांना गावात प्रवेश करता येत नव्हता.त्यामुळे नाईजास्तव गर्भवती महिलेला पाण्यातून वाट काढून रूग्णालयात पोहोचाव लागलं आहे.
advertisement
खरं तर शनिवारी दुधना नदीला मोठा पूर आल्याने लाडसावंगी सय्यदपुर गावाला जोडणारा नळकांडी पुल वाहून गेला होता. त्यामुळे सय्यदपुर गावाला जायला रस्ता नसल्याने सोमवारी गावातील विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारण्याची वेळ आली होती. या गावातील पन्नास विद्यार्थी लाडसावंगी येथील शाळेत दररोज यावे लागते.मात्र पुर येऊन दोन दिवस झाले पुराचे पाणी अद्याप गेले नसल्याने ग्रामस्थांना ये-जा करण्यास प्रचंड त्रास होत होता.या कारणामुळे वाहने देखील गावात येऊ शकत नव्हती.
पुल वाहून गेल्याच्या दोन दिवसांनी सोमवारी सायंकाळी 6 वाजता कोमल सिरसाठ यांना प्रसुती पुर्व वेदना सुरू झाल्या होत्या. पण गावातील पूल वाहून गेल्याने आणि कोणतेही वाहनं गावात येऊ न शकल्याने नाईलास्तव सिरसाठ कुटुंबियांना घरातील इतर महिलांच्या सहाय्याने गर्भवती महिलेला पूराच्या पाण्यातून वाट काढून लाडसावंगीचे प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागले.
दरम्यान सोमवारी रात्रीच महिलेची प्रसूती झाली आहे.बाळ बाळंतीण सुखरूप आहेत. पण बाळंतीण आणि नवजात शिशूला गावाला न्यायला देखील पुन्हा तीच अडचण होती. त्यामुळे पूल वाहून गेलेला त्याच पाण्यातून ग्रामस्थांनी तारेवरची कसरत करीत बाळ आणि बाळंतीण घरी सुखरूप पोहचवले.
