नागपूर, 6 सप्टेंबर : सना खान यांची हत्याच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सना खानची हत्या केल्यानंतर ज्या कारमधून मृतदेहाची विल्हेवाट लावली त्या कारमधील रक्ताचे नमुने आणि सना खान यांच्या आईच्या रक्ताचे डीएनए जुळले आहेत, त्यामुळे सना खान यांची हत्याच झाल्याचा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.
भाजप अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी सना खान या दोन ऑगस्टपासून बेपत्ता होत्या, पण त्यांचा मृतदेह सापडत नव्हता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अमित शाहू याला अटक केली होती. आरोपीने सना खान यांची हत्या केल्याची कबुली दिली, त्यानंतर पोलिसांकडून सना खान यांच्या मृतदेहाचा शोध सुरू होता.
advertisement
दरम्यान सना खान यांच्या मृतदेहाचा शोध पोलिसांकडून सुरू असताना पोलिसांना मध्य प्रदेशातील सिहोरी ग्राम इथ नर्मदा नदीच्या पात्रात एक मृतदेह आढळून आला होता. मात्र तो मृतदेह सना खान यांचा नसल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी सना खान यांच्या मृतदेहाचा शोध सुरूच ठेवला होता.
हिरन नदी आणि नर्मदा नदी पात्रात 300 किलोमीटर शोध घेऊनही सना खान यांचा मृतदेह सापडला नसल्यानं अखेर पोलिसांनी ही शोधमोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला होता.
सना खान यांच्या हत्तेतील आरोपी अमित शाहू सेक्सटोर्शन रॅकेट चालवायचा, असं समोर आलं आहे. तो श्रीमंत लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायचा.
मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये मेहरूनिसा खान यांच्या तक्रारीवरून आरोपी पप्पू साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेरीस या प्रकरणी आरोपी अमित शाहुला नागपूर पोलिसांनी अटक केली. त्याची चौकशी केली असताना त्याने सना खान यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमितने पत्नी सना खानची हत्या ही पैशांच्या व्यवहारातून केली असल्याचं समोर येतंय. अमित साहूने पत्नीकडून 50 लाख रुपये इतकी रक्कम पार्टनरशिपसाठी घेतली होती. सनाने हे पैसे परत मागितले तेव्हा दोघांमध्ये वाद झाला.
