20 वा हप्ता वितरित, पण अनेकांना लाभ नाही
पीएम किसान योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये जमा केले जातात. हा लाभ नियमितपणे मिळण्यासाठी दरवर्षी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. शासनाने वेळोवेळी आदेश देऊनही, जिल्ह्यांतील 25 हजार शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे त्यांना 20 व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागले आहे.
advertisement
हप्ता न मिळण्याची प्रमुख कारणे
- जमिनीच्या नोंदीतील त्रुटी : कागदपत्रे अपूर्ण असणे किंवा जमिनीच्या नोंदीत चुकीची माहिती असणे.
- आधार लिंकिंग नाही : बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले नसणे.
- पात्रता निकष पूर्ण नसणे : सरकारी नोकरी किंवा दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असणे.
- तांत्रिक अडचणी : पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी असणे.
ई-केवायसी कुठे करायची?
जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केली नसेल, तर ती पूर्ण करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत
- ऑनलाइन : pmkisan.gov.in या वेबसाइटवर ‘ई-केवायसी’ (e-KYC) पर्याय निवडून आधार क्रमांकाद्वारे ओटीपी पडताळणी करा.
- ऑफलाइन : जवळच्या कोणत्याही नागरिक सुविधा केंद्रात जाऊन बायोमेट्रिकद्वारे ई-केवायसी करता येते.
- मोबाइल ॲप : पीएम किसान ॲपद्वारेही तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
ही योजना केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केली असून, या योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
हे ही वाचा : कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 'मिशन मोड'वर काम! 60 हजार खटले वर्ग होणार, 700 वकिलांना मिळणार संधी!
हे ही वाचा : जबरदस्तीने वर्गणी घ्याल, तर दाखल होणार खंडणीचा गुन्हा; कोल्हापूरच्या गणेश मंडळांना पोलिसांचा इशारा!
