अजित पवार नेमकं काय काय म्हणाले?
काही जणांना पहिल्या टर्मलाच वाटतं की मी मोठा झालो पाहिजे. मी पुढं येऊन भाषण केलं पाहिजे. मी माझ्या पक्षाचं काम करतोय, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतायेत. पण माझ्या पक्षात काय करावं याचा सल्ला दुसरेच मला द्यायला लागलेत. तुमचं तुम्ही बघा आमचं आम्ही बघतो ना... मगाशी कुणीतरी म्हटलं गावकीकडं लक्ष देताय, भावकीकडं लक्ष द्या. भावकीकडं लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास, असं म्हणत अजित पवार यांनी रोहित पवारांना टोला लगावला.
advertisement
माझ्या नादी लागू नका - अजित पवार
जयंतराव त्यांना विचारा, आपल्याला किती मतं मिळाली. आपण पोस्ट बॅलेटमध्ये आलाय. त्याच्यामुळं माझ्या कुणीही नादी लागू नका. तुम्ही तुमचं काम करा, मी काहीही बोलणार नाही. मी महायुतीमध्ये आल्यापासून कधी तुमच्या कुणावर कधी टीका केली का? काहीही कारण नाही. शेवटी साध्य काय करायचंय तर ते महाराष्ट्राचा विकास... आम्ही विचारधारेत कॉम्प्रोमाईज करतच नाही, असं अजित पवार म्हणाले.
माझं नशीब चांगलं, सगळं जुळूनच येतंय - अजितदादा
मला मगाशी रोहितनेच सांगितलं, जयंतरावांचं 12 ला हॅलिकॅप्टर आहे. मी पण तिथूनच जाणारे... मग मला वाटलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाहीयेत. पण दोघंही आले अन् मला बोलता आलं, असं म्हणत अजित पवार यांनी हास्यकल्लोळ उडवला. शेवटी माझं नशीब चांगलंय. कसं का होईना सगळं जुळूनच येतंय, असं म्हणत अजित पवार मनातलं बोलून गेले.