पश्चिम महाराष्ट्रात पाऊस वाढल्यास चिंता
सध्या अलमट्टी धरणात पाण्याची आवक 45455 क्यूसेक इतकी आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली, तर धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवणे कठीण होऊ शकते. यामुळे अलमट्टी धरणाच्या खालील कर्नाटकातील गावांना पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
पुराचा धोका टाळण्यासाठी विसर्ग सुरू
advertisement
पुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरण व्यवस्थापनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सध्या 42500 क्यूसेक विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
धरणांतील पाणीसाठ्याची आकडेवारी
हे ही वाचा : निसर्गाचा प्रकोप, रस्ते झाले नद्या अन् शहर झालं तलाव; महाराष्ट्राच्या सिमेवरील 4 VIDEO
हे ही वाचा : प्रवास करताना काळजी घ्या! रक्षाबंधनाला भावा-बहिणींना पाऊस भिजवणार, विदर्भासह 10 जिल्ह्यांमध्ये अलर्ट