सांगली : यंदाच्या गणेशोत्सवात विविध रुपातील, रंगातील, आकारातील बाप्पाच्या मूर्ती आपण पाहतोय. आगमनापासून विसर्जनापर्यंतचा विविध रंगी थाटही पाहतोय. यातच सांगलीच्या इस्लामपूर शहरातील तरुणांनी रासायनिक रंगांना फाटा देत पिस्त्याचा वापर करून बाप्पाचे विलोभनीय रूप साकारले आहे.
लोकल18 शी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. "प्रत्येक वर्षी इतरांपेक्षा वेगळी गणेश मूर्ती साकारण्याचा आमचा प्रयत्न असतो. यापूर्वी आम्ही काजू -बदाम पासून मूर्ती तयार केली होती. यंदा पिस्त्यापासून साकारली आहे. यामध्ये कोणतेही रासायनिक रंग वापरले नाहीत. मंडळातील 8 कार्यकर्त्यांनी अवघ्या 2 दिवसात मूर्ती तयार केली,", असे या मंडळाचे सदस्य राज पाटील यांनी सांगितले.
advertisement
नाकाला जीभ लावूनच दाखवली! पुण्यातील 76 वर्षांच्या आजोबांची गिनीज बुकात नोंद, VIDEO
पुढे बोलताना ते म्हणाले की, "साडेचार फुटी दगडूशेठ रूपातील ही मूर्ती आहे. मूर्तीच्या सजावटीसाठी आम्ही पाच किलो पिस्त्याचा वापर केला आहे. तसेच अगदी थोड्या प्रमाणात मोती, खडे आणि मण्यांचा वापर केला आहे. मूर्तीच्या विसर्जनानंतर मासे आणि इतर जलचरांना मणी आणि खेड्यांपासून हानी पोहोचू नये यासाठी आम्ही मणी आणि खडे विसर्जनापूर्वी काढून घेणार आहोत. सजावटीसाठी वापरलेल्या पिस्त्याचा जलचरांना खाद्य म्हणून उपयोग होईल," असेही ते म्हणाले.
150 वर्षांची परंपरा, कोल्हापुरात "अशी" सुरू होते बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक, VIDEO
कै. संग्राम पाटील मंडळाच्या 8 कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन अवघ्या 2 दिवसात बापाची सुंदर मूर्ती साकारली आहे. बाप्पाच्या सजावटीसाठी 5 किलो पिस्त्याचा वापर केला आहे. तसेच उंदराच्या सजावटीसाठी अगदी कल्पकतेने उडदाचा वापर केला आहे. मूर्तीचे वेगळेपण साकारताना या गणेशभक्तांनी पर्यावरणाचाही विचार केलेला दिसतो.
मूर्ती साकारताना वापरलेल्या 5 किलो पिस्त्याचा जलचरांना खाद्य म्हणून उपयोग होईल. तर सजावटीसाठी वापरलेले मूठभर खडे आणि मोती कार्यकर्ते विसर्जनापूर्वी काढून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणाच्या दृष्टीने मूर्ती बनवल्यामुळे उरूण इस्लामपुरातील सिद्धनाथ मंदिर परिसरातील पाटील गल्लीतील या 'पिस्त्याचा गणपती'ची सर्वत्र चर्चा होत आहे.