सुट्ट्यांमधे प्रवासासाठी अशी धावणार गाडी
दिवाळीनिमित्त सुट्यांमध्ये ये-जा करण्यासाठी विशेष गाडी सुरू करण्यात आलीये. हुबळी-मुजफ्फरपूर एक्स्प्रेस (क्रमांक 07315) ही गाडी सांगली स्थानकावर थांबणार आहे. सांगलीतून जबलपूर, प्रयागराज, पटना येथे जाण्यासाठी प्रवाशांची सोय झाली आहे. हुबळी येथून 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:20 वाजता ही गाडी सुटेल आणि 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता मुजफ्फरपूर स्थानकावर पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07316 ही व्हाया पटना जाणारी प्रयागराज, जबलपूर, सांगलीमार्गे धावेल. मुजफ्फरपूर येथून दुपारी 1:15 वाजता सुटून 9 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता हुबळीला पोहोचेल.
advertisement
Weather Forecast: सुट्टीदिवशी हजेरी! पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, 3 जिल्ह्यांना अलर्ट
या प्रवाशांना होणार फायदा
सांगली स्थानक ते पुणे, दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, पीटी, दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर आणि हाजीपूर, असा प्रवास करता येईल. प्रवाशांना रेल्वेच्या विशेष फेरीचा फायदा होणार आहे.
तिकीट काढताना टाकावे बोर्डिंग स्टेशन
या गाडीचे तिकीट काढताना बोर्डिंग स्टेशन सांगली टाकावे, असे आवाहन सांगली डेव्हलपमेंट ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.