'माझं लग्न लावत नाहीस', म्हणत कुऱ्हाड घेतली अन् आईच्या डोक्यात घातली, न्यायालयाने मुलाला दिली 'ही' शिक्षा

Last Updated:

Satara Crime : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मोराळे गाव एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने हादरले. 'माझ्यापेक्षा लहान मुलांची लग्न झाली, पण तू माझं...

Satara Crime
Satara Crime
Satara Crime : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मोराळे गाव एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने हादरले. 'माझ्यापेक्षा लहान मुलांची लग्न झाली, पण तू माझं लग्न लावून देत नाहीस,' या क्षुल्लक कारणावरून सतत आईशी वाद घालणाऱ्या किरण शहाजी शिंदे (वय-32) या मुलाने क्रूरतेचा कळस गाठला. 11 डिसेंबर 2019 च्या रात्री, याच कारणावरून त्याने आपली आई कांताबाई शहाजी शिंदे (वय-55) यांच्याशी पुन्हा वाद घातला.
थरारक घटनाक्रम
रागाच्या भरात किरणने प्रथम आपले वडील शहाजी शिंदे यांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्यांना घराबाहेर ढकलून दिले. त्यानंतर त्याने घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला. घरात अडकलेल्या आई कांताबाई यांच्यावर त्याने कुऱ्हाडीने हल्ला केला. डोक्यात वर्मी घाव बसल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया
या भयंकर घटनेनंतर वडील शहाजी शिंदे यांनी वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि आरोपी किरणला अटक केली. सखोल तपासानंतर पोलिसांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
advertisement
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजित कदम यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांनी न्यायालयात एकूण दहा साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यासोबतच, परिस्थितीजन्य पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि पोलिसांचा तपास यांसारखे भक्कम पुरावे सादर केले गेले.
न्यायालयाचा अंतिम निकाल
सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. कोले यांनी आरोपी किरण शिंदे याला जन्मदात्या आईच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला आणखी एक महिन्याची साधी कैद भोगावी लागेल, असा निकाल दिला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
'माझं लग्न लावत नाहीस', म्हणत कुऱ्हाड घेतली अन् आईच्या डोक्यात घातली, न्यायालयाने मुलाला दिली 'ही' शिक्षा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement