पूजाच्या प्रेमात वेडा, कधी बीड तर कधी वैरागच्या लॉजवर घडायचं नको तेच, बर्गे प्रकरणात नवा खुलासा

Last Updated:

Dancer Pooja Gaikwad Case: बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कारमध्ये बसून स्वत:वर गोळी झाडून घेतली.

News18
News18
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कारमध्ये बसून स्वत:वर गोळी झाडून घेतली. बर्गे यांनी कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्या घरासमोर हे टोकाचं पाऊल उचललं. पूजा गायकवाडने संपर्क तोडल्याच्या नैराश्यात येऊन गोविंद बर्गे याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं सुरुवातीपासून सांगितलं जात होतं. आता या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. पूजा आणि गोविंद यांच्यात केवळ ग्राहक आणि नर्तिका एवढ्यापुरतं नातं नव्हतं. दोघंही रिलेशनशिपमध्ये होते, अशी माहितीही आता समोर आली आहे.
मयत गोविंद हा पूजा गायकवाडच्या प्रेमात पार बुडाला होता. दोघं अनेकदा कलाकेंद्रा व्यतिरिक्त अनेक ठिकाणी एकमेकांना भेटायचे. बीडसह वैराग परिसरातील विविध लॉजवर देखील ते सोबत राहिले आहेत. याशिवाय ते कधी घरी किंवा फ्लॅटवर भेटत असल्याची देखील माहिती आहे. पोलिसांनी पूजा गायकवाडच्या केलेल्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. आपण गोविंदसोबत प्रेमसंबंधात होतो, अशी कबुलीही पूजाने दिली आहे.
advertisement
याशिवाय, पूजा गायकवाडच्या बँक खात्यात गोविंद बर्गेच्या नावाने अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलिसांनी या प्रकरणातील अनेक बाबींचा छडा लावला आहे. तसेच, पूजा गायकवाडसोबत काम करणाऱ्या काही सहकारी आणि मैत्रिणींचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.
पूजा गायकवाडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी, या प्रकरणाची पुढील चौकशी करण्याचे पोलिसांचे हक्क कायम आहेत. पोलीस या प्रकरणातील इतर पैलूंवर अधिक तपास करत आहेत. गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी नर्तिका पूजा गायकवाडला व्हॉट्सअॅप मेसेज केले होते. ज्यात त्याने आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली होती. दरम्यान, पूजाने संपर्क तोडल्यामुळे नैराश्यात गेल्याने गोविंदने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणात आता विविध धागेदोरे समोर येत आहेत. पोलीस सविस्तर तपास करत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
पूजाच्या प्रेमात वेडा, कधी बीड तर कधी वैरागच्या लॉजवर घडायचं नको तेच, बर्गे प्रकरणात नवा खुलासा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement