'...नाहीतर घरी बसून पोळ्या लाटायच्या', दोघेही एकाच क्षेत्रात, तरी अशोक सराफ पत्नी निवेदिता यांना असं का म्हणाले होते?
- Published by:Minal Gurav
 
Last Updated:
Ashok-Nivedita Saraf : अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे एकाच क्षेत्रात काम करतात. तरीही '... नाहीतर घरी बसून पोळ्या लाटायच्या' असं अशोक सराफ यांनी निवेदिता यांना ठणकावून सांगितलं होतं. ते असं का म्हणाले होते? 
 नवरा आणि बायको एकाच क्षेत्रात असतील आणि त्यातही दोघे कलाकार असतील तर लग्नानंतर बऱ्याचदा अभिनेत्रीचं करिअर थांबायच. अभिनेत्याला कोणतंच बंधन नसायचं. पण काळ जसा पुढे सरकत गेला तशी ही समीरकरणं देखील बदलत गेली. अभिनेत्री नीतू कपूर या लग्नानंतर संसार करण्यासाठी घरी बसल्या पण त्याची सून आलिया भट्ट मात्र लग्नानंतरही काम करतेय.
advertisement
 अभिनेत्रीचं लग्न झालं की तिला डिमांड कमी होतोस तिची काम कमी होतात असं म्हटलं जातं. मराठीतही असं होतं का? असा प्रश्न विचारला असता निवेदिता सराफ म्हणाल्या, "सगळ्यांनी आता हे खोटं ठरवलं आहे. आता आलिया भट्ट, करिना कपूर यांच्याकडे बघा, त्या काम करतात. मराठीतही कितीतरी अभिनेत्री आहेत, मधुरा काम करतेय, प्रिया बापट धैर्याने उत्तम उत्तम रोल केले त्यातील एक सिटी ऑफ ड्रिम. उमेशही... ते उत्तम व्यावसायिक कपल आहे."
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
 निवेदिता सराफ यांनी पुढे सांगितलं, "अभिनय करताना कलाकाराबरोबर जवळीक येणं हा तुमच्या कामाचा भाग आहे. कधी होत असेल की तुम्ही स्वत:ला व्यवस्थित मेंटेन केलं नसेल, तुम्ही जर वेडंवाकडं जाड होऊन दिलं, तुम्ही स्वत:ला ग्रुम नाही केलं तर त्याचा परिणाम होऊ शकतो. पण जर तुम्ही स्वत:ला नीट मेन्टेन केलं तर मला नाही वाटत की तुमचं लग्न झालं आहे म्हणून कोणता प्रोब्लेम येईल."


