Numerology: जोडीदार भाग्याचं दार उघडतो! या 3 जन्मतारखेची माणसं लग्नानंतर कुठल्या कुठं पोहचतात
- Published by:Ramesh Patil
 
Last Updated:
Numerology: अंकशास्त्रानुसार, प्रत्येकाच्या जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो. मूलांकावरून व्यक्तिच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात. मूलांकानुसार व्यक्तिचे व्यक्तिमत्त्व, विचार, करिअर, रिलेशन आणि जीवनाचे विविध पैलू यासारख्या अनेक गोष्टी कशा असतील ते ओळखता येतील. प्रत्येक मूलांकाचा स्वतःचा एक विशेष अर्थ आणि प्रभाव असतो.
advertisement
 मूलांक 7 चे लोक असतात?ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला झालेला असतो त्यांचा मूलांक 7 असतो. या मूलांकावर केतू ग्रहाचा प्रभाव मानला जातो. केतू ग्रहाच्या प्रभावामुळे व्यक्तिला रहस्यमय, अंतर्मुखी, आध्यात्मिक आणि चिंतनशील करतो. हे लोक जीवनातील गूढ पैलू समजून घेण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येक कामात परिपूर्णता शोधण्याच्या मागे लागलेले असतात.
advertisement
 स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व - मूलांक 7 चे लोक खूप शांत स्वभावाचे, समजूतदार आणि खोलवर विचार करणारे असतात. त्यांना गर्दी दर्दी व्हायला आवडत नाही, त्याऐवजी ते आपल्या खासगी विश्वात राहणं पसंत करतात. दोस्ती-यारी-नात्यात ते खऱ्या मनाने आणि पूर्ण निष्ठेने नाती निभावतात. यांचा कल सर्जनशीलता, संशोधन, शिक्षण आणि अध्यात्माकडे अधिक असतो. त्यांची अंतर्ज्ञान शक्ती मजबूत असते आणि ते अनेकदा इतरांपेक्षा गोष्टी अधिक सखोलपणे समजून घेतात.
advertisement
 लग्नानंतर कसं नशीब चमकतं? -अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 च्या लोकांच्या आयुष्यात विवाह एक टर्निंग पॉइंट ठरतो. लग्नानंतर त्यांना भावनिक संतुलन आणि मानसिक स्थिरता मिळते. जीवनसाथीच्या साथीनं त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते नवीन ऊर्जेने पुढे जातात. विवाहानंतर त्यांच्या आर्थिक स्थितीत आणि करिअरच्या वाढीमध्ये सुधारणा दिसून येते. भाग्याची साथ मिळाल्यानं जीवनात सकारात्मक बदल येतात आणि ते यशाच्या नव्या उंचीला स्पर्श करू लागतात.
advertisement
 कोणते मूलांक ठरतात यांच्यासाठी लकी जोडीदार?अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 च्या लोकांचे लग्न जर योग्य मूलांक असलेल्या व्यक्तीसोबत झाले, तर त्यांचे वैवाहिक जीवन खूप यशस्वी आणि भाग्यशाली ठरते. मूलांक 7 च्या लोकांना चांगला जीवनसाथी मिळाल्यास त्यांच्या नात्यात प्रेम आणि संतुलन तर येतेच शिवाय त्यांचे नशीबही त्यांची साथ देऊ लागते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


