'प्रत्येक क्षणाला मरतोय...' अहमदाबाद विमान अपघातात वाचलेल्या विश्वास कुमार यांनी 5 महिन्यांनंतर सांगितली आपबिती
- Published by:Kranti Kanetkar
 
Last Updated:
AI 717 विमान क्रॅशमध्ये 241 जणांचा मृत्यू, विश्वास कुमार रमेश एकटे वाचले. अपघातानंतर मानसिक त्रास, कुटुंबाला Air India कडून 21500 पाउंड मदतीचा प्रस्ताव.
अहमदाबादहून लंडनला निघालेलं AI 717 विमान क्रॅश झालं. 12 जून रोजी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेत जवळपास 241 कर्मचारी आणि प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मेडिकल हॉस्टेलमधील 19 जणांचा मृत्यू झाला होता. या भीषण अपघातातून इमर्जन्सी सीटवर बसलेले विश्वास कुमार रमेश एकटे वाचले होते. या अपघातातून वाचल्यानंतर सावरण्यासाठी त्यांना बराच वेळ गेला. या दुर्घटनेला पाच महिने उलटले, मात्र अजूनही ते सर्वसामान्य लोक जगतात तसं जगू शकत नाहीत. त्यांना याचा इतका मानसिक धक्का बसला आहे, की त्यातून सावरणही कठीण झालं आहे.
परिस्थिती इतकी वाईट आहे की कुटुंबाशी बोलणंही कठीण होत आहे. बीबीसी न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान विश्वास कुमार यांनी दु:ख व्यक्त केलं. मी माझ्याा लहान भावाला गमावलं, मी अपघातातून वाचलो हाच एक मोठा चमत्कार आहे. सर्वात नशीबवान माणूस मी स्वत:ला समजतो. A11 मी बसलो होतो तर माझा भाऊ J11 सीटवर बसला होता. मी त्याला गमावलं, सगळं डोळ्यादेखत घडत होतं.
advertisement
घरी परतल्यानंतर विश्वास यांना पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरचा सामना करावा लागत आहे. ते बोलताना भावुक झाले. मी एकटाच वाचलो यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. माझा भाऊ माझा आधारस्तंभ होता. गेल्या काही वर्षांपासून तो नेहमी मला साथ देत होता. आता मी एकटा पडलो आहे. मी फक्त माझ्या खोलीत एकटा बसून असतो, बायकोशी, मुलाशी बोलत नाही. मला फक्त घरात एकटं राहायला आवडतं. त्या दुर्घटनेची आठवण आली तरी अंगावर काटा येतो.
advertisement
या अपघातानंतर शारीरिक आणि मानसिकरित्या सावरणं माझ्यासाठी खूप कठीण होत आहे. फक्त माझ्यासाठीच नाही तर कुटुंबासाठी देखील हे खूप कठीण आहे. आईला चार महिने झाले, ती रोज दरवाजाबाहेर बसून असतात, कोणाशी बोलत नाहीत, काही नाही. मीही कोणाशी बोलत नाही. मला कोणाशी बोलायला आवडत नाही. मला जास्त बोलता येत नाही. मी रात्रभर विचार करत असतो, मी मानसिकदृष्ट्या अजूनही लढत आहे. मला अजूनही नीट चालता येत नाही. बायकोची मदत घ्यावी लागते. त्या घटनेनंतर अजूनही कामावर जाता आलं नाही. गाडी चालवणं शक्य होत नाही. रात्रभर तेच विचार सारखे मनात येतात. मानसिक त्रास भयंकर होत आहे.
advertisement
एअर इंडियाने या कुटुंबाला 21500 पाउंड मदत देण्याचा प्रस्ताव दिला आहे. एअर इंडियाने त्यांना तीनवेळा बैठकीसाठी आमंत्रण पाठवलं, मात्र त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळेल अशी आशा असल्याचं एअर इंडियाने म्हटलं आहे. त्यांच्याशी चर्चा करायची असल्याचंही ते म्हणाले. मात्र सध्या त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने एअर इंडिया देखील प्रयत्न करत आहे.
view commentsLocation :
Gujarat
First Published :
November 04, 2025 9:18 AM IST
मराठी बातम्या/देश/
'प्रत्येक क्षणाला मरतोय...' अहमदाबाद विमान अपघातात वाचलेल्या विश्वास कुमार यांनी 5 महिन्यांनंतर सांगितली आपबिती


