डिझेल घेतलं अन् बायकोला पेटवून दिलं, संशयाच्या भूताने कुटुंब उद्ध्वस्त केलं, सांगली हादरली!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील सावंतवाडी येथे एका पतीने दारूच्या नशेत आणि चारित्र्याच्या संशयावरून पत्नीशी वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर...
कोकरूड : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शिराळा तालुक्यातील सावंतवाडी येथे घडली आहे. या हल्ल्यात गंभीर भाजलेल्या पत्नीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. पतीला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रागाच्या भरात पेटवलं बायकोला
संजय बयाजी बेंगडे (वय-53) असे आरोपी पतीचे नाव असून, त्याच्या हल्ल्यात अनिता संजय बेंगडे (वय-40) यांचा मृत्यू झाला. संजयला दारूचे व्यसन होते आणि याच व्यसनापायी तो अनिताच्या चारित्र्यावर संशय घेत तिला नेहमी मारहाण करत असे. गुरुवारी (11 सप्टेंबर) रात्री अनिता घरात स्वयंपाक करत असताना, संजयने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने शिवीगाळ करत अनिताला मारहाण केली. रागाच्या भरात त्याने चूल पेटवण्यासाठी आणलेले डिझेल तिच्या अंगावर ओतले आणि तिला पेटवून दिले. या घटनेत अनिता सुमारे 70 टक्के भाजली.
advertisement
अखेर मृत्यूनं गाठलं
गंभीर अवस्थेत तिला तातडीने कराड आणि नंतर सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक बनत गेली आणि रविवारी पहाटे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अनिताने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी पती संजय बेंगडेविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेनंतर पोलीस उपविभागीय अधिकारी अरुण पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी घटनास्थळाला भेट दिली असून, पुढील तपास सुरू आहे.
advertisement
हे ही वाचा : 1.5 कोटी कर्जाचे आमिष, 23 लाखांची फसवणूक, साताऱ्यातील 'हा' कांड ऐकून तुम्हीही व्हाल चकित!
हे ही वाचा : 'तुझी सुपारी देईन', संभाजीनगरमध्ये वकीलाची विभक्त महिलेला धमकी, म्हणाला 'दोन पोरांसोबत...'
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 2:55 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
डिझेल घेतलं अन् बायकोला पेटवून दिलं, संशयाच्या भूताने कुटुंब उद्ध्वस्त केलं, सांगली हादरली!