'तुझी सुपारी देईन', संभाजीनगरमध्ये वकीलाची विभक्त महिलेला धमकी, म्हणाला 'दोन पोरांसोबत...'

Last Updated:

छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी भागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका वकिलाने नवऱ्यापासून विभक्त झालेल्या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

News18
News18
छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी भागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका वकिलाने नवऱ्यापासून विभक्त झालेल्या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पीडित महिलेनं दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपी वकिलाने तिला धमकी दिली. एवढंच नव्हे तर पीडित महिलेचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. हा सगळा प्रकार शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास मुकुंदवाडी भागात घडला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अॅड. महेंद्र भगवान नैनाव असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. तो उत्तरानगरी भागातील साईनक्षत्र अपार्टमेंटमधील रहिवासी आहे. २७ वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षणासाठी आरोपी अॅड. महेंद्र नैनावसोबत राहत होती. त्याने तिच्यावर लग्नाचे आमिष दाखून लैंगिक अत्याचार केल्यामुळे त्याच्याविरुद्ध ३ ऑगस्ट रोजी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
advertisement
तेव्हापासून ती वेगळी राहते. दरम्यान, शनिवारी रात्री घरी असताना तिला आरोपी नैनावचा व्हॉट्सअॅपवर मेसेज आला. तू केस मागे घेणार बोलली होती, परंतु तू केस मागे न घेता परत पोलीस ठाण्यात तक्रार केली. मी तुझी सुपारी देतो, माझ्याकडे तुझे दुसऱ्या मुलांसोबतचे फोटो आहेत, माझ्यासोबतही तुझे काही व्हिडिओ आहेत, ते मी व्हायरल करून तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी रविवारी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आरोपी महेंद्र नैनाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
हा प्रकार घडल्यानंतर मध्यरात्री पीडिता मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गेली. मात्र कर्तव्यावरील महिला पोलिस अंमलदाराने तिला अरेरावी करून धक्काबुक्की केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. बराच वेळ ठाण्यात गोंधळ सुरू होता. तिने वरिष्ठांना फोन केले. मात्र काहीही कारवाई न केल्याने तिने रविवारी पालकमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेऊन प्रकार सांगितला. त्यांनी तत्काळ पोलीस प्रशासनाला पीडितेला न्याय मिळवून देण्याचे आदेश दिले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
'तुझी सुपारी देईन', संभाजीनगरमध्ये वकीलाची विभक्त महिलेला धमकी, म्हणाला 'दोन पोरांसोबत...'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement