छोटे केस, मुलांसारखं रहाणीमान, वडिलांचे स्वप्न, समाजाचे टोमणे! रजपूत तरुणी कोण आहे 'रतन चौहान'?

Last Updated:
रतन चौहानने जयपूरमध्ये संघर्षातून फॅशन इन्फ्लुएंसर आणि बुटीक ओनर म्हणून यश मिळवलं. तिच्या डिझाइन्स विदेशात पोचतात आणि ती तरुणींना रोजगार देते.
1/9
छोटे केस, आवाज मुलीचा पण हुबेहुब मुलासारखं राहणारी, वागणारी आणि घरचा अगदी मुलगाच म्हणा ना अशी असलेली रतन चौहान सोशल मीडियावर कायम आपल्या ट्रेंडी लूकमुळे चर्चेत आली आहे. रतनने खूप सोसलं आहे. 10 पर्यंत एकदम बिनधास्त जगलेल्या रतनच्या खांद्यावर अचानक घराची जबाबदारी आली. वडिलांची प्रकृती खालवल्यामुळे आणि काही पर्सनल गोष्टींमुळे रतनवर आणि तिच्या कुटुंबाला खूप सोसावं लागलं.

advertisement
2/9
शिकायचं पण पैसा उभा कसा करायचा? मग रतनने सोशल मीडियाचा आधार घेतला. टिकटॉक, इतर सोशल मीडियावर रिल्स करु लागली. मुलीने छोटे केस ठेवले म्हणजे ती बिघडली...असे टोमणे सतत रतन चौहानच्या कानावर पडायचे. तेव्हा ती फक्त एक साधी कॉलेज विद्यार्थिनी होती. पण हाच ‘अपमानाचा क्षण’ तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला.

3/9
आज ती जयपूरमधील प्रसिद्ध फॅशन इन्फ्लुएंसर आणि बुटीक ओनर म्हणून स्वतःच्या पायावर उभी आहे. तिचे कपडे जयपूरहून थेट विदेशात पोचतात. पण या यशामागे आहे एक वेदनादायी आणि धैर्याने भरलेला संघर्ष. राजस्थानातील पारंपरिक राजपूत घरात जन्मलेल्या रतनला लहानपणापासून अनेक बंधनं होती. ती सांगते, आमच्या घरी मुलींना पँट-शर्ट घालणं तर दूरच, केस छोटे करणं म्हणजे पाप मानलं जायचं. पण मला खेळायचं होतं, स्पोर्ट्समध्ये जायचं होतं, म्हणून मी केस कापले. आणि तिथून सगळं बदललं.

4/9
घरच्यांचा विरोध, समाजाची निंदानालस्ती आणि लोकांच्या कटाक्षांमध्ये ती दिवसेंदिवस एकटी पडत गेली. तिला स्वत:ला सिद्ध करायचं होतं. कॉलेजच्या पहिल्या वर्षात रतनने मैत्रिणीच्या मोबाईलवर छोटा डान्स व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला, पण त्यावर आलेल्या वाईट कमेंट्सनी ती हादरली. मी कुणाचं वाईट केलं नव्हतं, पण लोकांच्या शब्दांनी माझं मन तुटलं मला खूप वाईट वाटलं.

5/9
त्याच काळात वडिलांची तब्येत खालावली, घरात आर्थिक तंगी निर्माण झाली आणि सगळ्या जबाबदाऱ्या रतनवर आल्या. “तेव्हाच समजलं, आत्मविश्वास आणि थोडे पैसे नसले की माणूस आतून तुटतो,” असं रतन म्हणते. आर्थिक संकटात रतनने एका दुकानात सेल्सगर्ल म्हणून नोकरी धरली. महिन्याला मिळणारे तीन हजार रुपये तिच्यासाठी मोठं बळ ठरले. पण तिच्या मनात होतं. मी इथंच थांबायचं नाही. 2017 मध्ये तिने Vigo या अॅपवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. थोडीफार कमाई सुरू झाली. तिच्या ड्रेसिंग सेन्सकडे लोकांचं लक्ष गेलं आणि तिथून जन्म झाला तिच्या फॅशन ब्रँडचा.

6/9
जोश टॉकला दिलेल्या मुलाखतीदरम्यान रतनने वडिलांनी मित्राकडून २५ ते ३० हजार रुपये उसने घेतले आणि रतनला सांगितलं, ही शेवटची संधी आहे, स्वतःला सिद्ध करायची असं तिला वाटलं. त्या पैशांतून रतनने स्वतःचं छोटंसं बुटीक उघडलं. इंटीरियरपासून स्टॉकपर्यंत सगळं तिने स्वतः केलं.

7/9
पण दुकान उघडलं आणि लगेच लॉकडाउन लागला. घरात खायला अन्न नव्हतं. कधी कधी सकाळचं अर्धं अन्न रात्रीसाठी ठेवायचं लागायचं, ती सांगते. तरीही तिने हार मानली नाही. लॉकडाउन संपल्यावर तिचं बुटीक उघडलं आणि लोकांनी तिच्या कपड्यांचं कौतुक करायला सुरुवात केली.

8/9
2021 मध्ये वडिलांचं निधन झालं. हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी म्हटलं होतं, “मला तुझ्यावर विश्वास आहे, तू योग्य करशील.” हेच शब्द रतनच्या आयुष्याचं ध्येय बनले.वडिलांच्या जाण्यानंतर रतनने आई आणि भावाची जबाबदारी उचलली. ती अजून मेहनत करू लागली. आज तिचं बुटीक जयपूरच्या ओळखीचा भाग बनलं आहे आणि तिची फॅशन डिझाइन्स परदेशातही मागवली जातात.
2021 मध्ये वडिलांचं निधन झालं. हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी म्हटलं होतं, “मला तुझ्यावर विश्वास आहे, तू योग्य करशील.” हेच शब्द रतनच्या आयुष्याचं ध्येय बनले. वडिलांच्या जाण्यानंतर रतनने आई आणि भावाची जबाबदारी उचलली. ती अजून मेहनत करू लागली. आज तिचं बुटीक जयपूरच्या ओळखीचा भाग बनलं आहे आणि तिची फॅशन डिझाइन्स परदेशातही मागवली जातात.
advertisement
9/9
ती हसत म्हणते, आजही काही लोक म्हणतात, ‘छोटे केस ठेवून मुलगी कसली दिसते?’ पण मला माहिती आहे, माझी आई आणि वडील स्वर्गातून माझा अभिमान बाळगतात.”आज रतन चौहान सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स असलेली इन्फ्लुएंसर आहे. तिच्या बुटीकमध्ये तिथल्या तरुणींना रोजगार देते. केस किती लांब आहेत यावर नव्हे, तर स्वप्नं किती मोठी आहेत यावर ओळख ठरते.
ती हसत म्हणते, आजही काही लोक म्हणतात, ‘छोटे केस ठेवून मुलगी कसली दिसते?’ पण मला माहिती आहे, माझी आई आणि वडील स्वर्गातून माझा अभिमान बाळगतात.” आज रतन चौहान सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स असलेली इन्फ्लुएंसर आहे. तिच्या बुटीकमध्ये तिथल्या तरुणींना रोजगार देते. केस किती लांब आहेत यावर नव्हे, तर स्वप्नं किती मोठी आहेत यावर ओळख ठरते.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement