TRENDING:

आधी झाड लावा, मगच लग्नाची नोंद करा! महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीचा लय भारी निर्णय

Last Updated:

झाड लावताना ग्रामपंचायत सदस्यांपैकी एकाची उपस्थिती आवश्यक आहे. हा ठराव सक्तीचा नाही पण गरजेचा असल्याचं गावकरी सांगतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रीती निकम, प्रतिनिधी
advertisement

सांगली : 'झाडे लावा, झाडे जगवा' हे ब्रीदवाक्य आपण शाळेत शिकलो होतो. त्यावेळी त्याचं आवडीनं पालनही करायचो. परंतु नंतर मात्र अनेकजणांची आवडही कमी झाली, काहीजणांची पर्यावरणाविषयी जागरूकता कमी झाली, तर अेकजणांना धावपळीत, कामकाजात झाडं लावायला वेळच मिळत नाही. शहरांप्रमाणे आता गावाकडेही झाडांचं प्रमाण कमी झाल्याचं पाहायला मिळतं. हीच बाब गांभिर्यानं लक्षात घेऊन एका गावच्या ग्रामपंचायतीनं हटके निर्णय घेतलाय.

advertisement

या गावात आता लग्नाची नोंदणी तेव्हाच करता येईल, जेव्हा वधू-वर एक रोपलागवड करतील. लग्नाच्या नोंदणीसाठी येताना त्यांना आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांसह लागवड केलेल्या झाडाचा फोटोही सोबत घेऊन येणं बंधनकारक असणार आहे.

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कामेरी ग्रामपंचायतीनं विवाह नोंदणीसाठी हा अनोखा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमामुळे वृक्षलागवडीत निश्चितच वाढ होऊ लागलीये. नवविवाहितांना विवाह नोंदणी अर्ज, लग्नाचा फोटो, आधार कार्ड, इत्यादींसह 1 झाड लावल्याचा फोटो अर्जासोबत जोडणं बंधनकारक करण्यात आलंय. ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. सरपंच रणजित पाटील यांनी याबाबत माहिती दिली.

advertisement

'आमची ग्रामपंचायत नेहमीच वसुंधरा संवर्धनासाठी सज्ज असते. आजवर कामेरी ग्रामपंचायतीनं पर्यावरण संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. यापैकीच 'एक कुटुंब एक झाड', ज्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल त्या कुटुंबाला ग्रामपंचायतीकडून एक झाड भेट दिलं जात होतं. ज्याचं संगोपन संबंधित कुटुंब आपल्या मुलीसह करत होतं. आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं सार्वजनिक ठिकाणी, गावातील रस्त्यांच्या दुतर्फा देशी झाडं लावली आहेत. अलिकडे आम्ही वृक्षगणना केली. तेव्हा गावातील लोकसंख्येच्या तुलनेत निसर्ग संतुलनासाठी आमच्याकडे 6 टक्के झाडं कमी असल्याचं समजलं. यानंतर आम्ही वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी नव्या उपक्रमाच्या शोधात होतो. यातूनच आम्हाला नवविवाहितांच्या नोंदणीसाठी वृक्ष लागवड आणि संवर्धनाची कल्पना सुचली. त्यानुसार, ग्रामसभेत या ठरावाची मांडणी करण्यात आली. सर्व लोकांनी याला एकमुखानं पाठिंबा दिला. हा अनोखा असा ठराव आमच्या ग्रामपंचायतीकडून पास झाला. आता त्याची अंमलबजावणी सुरू आहे', असं रणजीत पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, झाड लावताना ग्रामपंचायत सदस्यांपैकी एकाची उपस्थिती आवश्यक आहे. हा ठराव सक्तीचा नाही पण गरजेचा असल्याचं गावकरी सांगतात.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
आधी झाड लावा, मगच लग्नाची नोंद करा! महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीचा लय भारी निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल