पुणे आणि हुबळी शहरांना जोडणारी वंदे भारत ट्रेन 7 प्रमुख स्थानकांवर थांबेल. पुणे ते हुबळी या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना आरामदायी आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी 8 आधुनिक डबे असणार आहेत. हुबळी ते पुणे व पुणे ते हुबळी या दोन्ही वंदे भारत गाडीच्या तिकिटांचे दर रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. चेअर कार व एक्झिक्यूटीव्ह श्रेणीच्या दरांमध्ये मोठा फरक असून, प्रवाशांना नव्या बैठक व्यवस्थेचा लाभ या गाडीच्या माध्यमातून मिळणार आहे.
advertisement
44 वर्षांपूर्वीची एक घटना अन् थेट मशिदीत बसवला गणपती! सांगलीतील गावात नेमकं काय घडलं?
चेअर कारचे तिकीट दर
हुबळी ते पुणे जेवणाशिवाय 1185 रुपये आणि जेवणासह 1530 रुपये, हुबळी ते सांगली 875 रुपये, धारवाड ते पुणे जेवणासह 1505 आणि जेवणाशिवाय 1160 रुपये, धारवाड ते सांगली 835 रुपये, बेळगाव ते पुणे जेवणासह 1295 आणि जेवणाशिवाय 955 रुपये, बेळगाव ते सांगली 625 रुपये, सांगली ते पुणे जेवणासह 965 आणि जेवणाशिवाय 730 रुपये दर असणार आहेत.
एक्झिक्यूटिव्ह श्रेणीचे दर
हुबळी ते पुणे जेवणासह 2780 आणि जेवणाशिवाय 2385, हुबळी ते सांगली 1640, धारवाड ते पुणे जेवणासह 2725 आणि जेवणाशिवाय 2325, धारवाड ते सांगली 1575, बेळगाव ते पुणे जेवणासह 2290 आणि जेवणाशिवाय 1890, बेळगाव ते सांगली 1145, सांगली ते पुणे जेवणासह 1690 आणि जेवणाशिवाय 1430 रुपये तिकीट दर असतील.
सांगली, मिरजला 2 वंदे भारत गाड्यांचा लाभ
'हुबळी ते पुणे' व 'कोल्हापूर ते पुणे' अशा दोन वंदे भारत गाड्या सांगली व मिरज स्थानकावरून धावणार आहेत. प्रवाशांमध्ये या रेल्वे बाबत मोठी उत्सुकता आहे. वंदे भारत गाडीची ट्रायल फेरीही पार पडली. आता प्रत्यक्ष 'वंदे भारत एक्सप्रेस'मधून प्रवास करण्याची सांगलीकर प्रवाशांची इच्छा सोमवारपासून पूर्ण होणार आहे.
हुबळी-पुणे गाडीचं बुकींग सुरू
दरम्यान, संकेतस्थळावरही 'हुबळी ते पुणे' व 'पुणे ते हुबळी' वंदे भारत एक्सप्रेसचे नाव दिसत आहे. हुबळी ते पुणे वंदे भारत एक्सप्रेससाठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे. कोल्हापूर ते पुणे वंदे भारताचे बुकिंग अद्याप सुरू झालेली नाही. आरआरसीटीसीच्या या गाडीचे दर जाहीर केल्यामुळे कोल्हापूर ते पुणे बुकिंगला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. "वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल यशस्वीरीत्या पार पडली आहे. आता बुकिंगची सोयही लवकरच उपलब्ध होईल. प्रवाशांनी या नव्या गाडीच्या सुविधेचा लाभ घ्यावा", असं आवाहन मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी केलंय.