कुटुंबातील चिमुकलीचा वाढदिवस... म्हणून संपूर्ण कुटुंब ते साजरा करायला गेलं. वाढदिवस साजरा करून हे कुटुंब परतत होतं, तेव्हाच काळानं त्यांच्यावर घाला घातला. कुटुंबाच्या कारला अपघात झाला. यात 6 जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने एक मुलगी बचावली पण तिला सहा मृतदेहांसोबत अख्खी रात्र काढावी लागली. सांगलीतील ही धक्कादायक घटना आहे.
राजेंद्र पाटील यांची मुलगी स्वप्नाली भोसले हिची 2 वर्षीय मुलगी राजवी हिचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी हे कुटुंब कोकळे इथं गेलं होतं. राजेंद्र यांच्यासोबत त्यांच्या दोन मुली, पत्नी आणि नाती होत्या. वाढदिवस साजरा करून ते घरी परतत होते. तेव्हा या कुटुंबावर काळानं घाला घातला. तेव्हा तासगाव-मणेराजुरी राज्य महामार्गावर त्यांच्या अल्टो कारला भीषण अपघात झाला आहे.
advertisement
कालव्यात पडली कार
त्यांची कार एस एस मंगल कार्यालयाजवळ ताकारी कालव्यात पडली. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्या गाडीचा अपघात झाला. दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक एक मुलगी जखमी झाली आहे.
मृतांमध्ये राजेंद्र पाटील (वय 60), त्यांची पत्नी सुजाता पाटील (वय 55), मुलगी प्रियांका खराडे (वय 30), नात ध्रुवा (वय 3), राजवी (वय 2), कार्तिकी (वय 1) यांचा समावेश आहे. तर राजेंद्र यांची दुसरी मुलगी स्वप्नाली भोसले (वय 30) ही जखमी झाली आहे.
Pune News : पोर्शे कार अपघात ताजा असताना आणखी एक Video व्हायरल; कारने तरुणाला 50 फुट नेलं फरफटत
बचावलेल्या महिलेला मृतदेहासोबत काढावी लागली रात्र
अपघातात एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाले आहेत. सुदैवाने या कुटुंबातील एक मुलगी बचावली. जी जखमी झाली. पण रस्त्यात कुणीही नसल्याने मदत मिळाली नाही. रात्रभर ती गाडीतच बसून होती. तिला मृतदेहासोबत गाडीतच रात्र काढण्याची वेळ तिच्यावर आली.