Pune News : पोर्शे कार अपघात ताजा असताना आणखी एक Video व्हायरल; कारने तरुणाला 50 फुट नेलं फरफटत
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Pune News : पोर्शे कार अपघात प्रकरण ताजं असताना पिंपरी चिंचवडमधील एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पिंपरी चिंचवड, (गोविंद वाकडे, प्रतिनिधी) : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताज असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाला कारने चिरडल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर ज्या पद्धतीने अपघाताचा तपास झाला, त्यावरुन हिंजवडी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
नेमका कसा घडला अपघात?
वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करत एका कार चालकाने एका तरुणाला गाडीखाली चिरडल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेत रस्त्याच्या कडेला वस्तू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अंगद गिरी असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वेदांत राय नामक 20 वर्षीय कार चालविणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी भादवी कलम 304 अ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.
advertisement
पुण्यात आणखी एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/1q9xeEHXNq
— News18Lokmat (@News18lokmat) May 28, 2024
पोलिसांच्या भूमिकेवर संशय
मात्र, या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी आरोपी रायची ब्लड टेस्ट केली नसल्याची बाब समोर आली आहे. एवढ्या रात्री अशा पद्धतीने बेदकारपणे आणि अतिशय वेगात कार चालविण्याचे कारण काय? आरोपी चालकाला अटक करून एव्हढी साधी बाब देखील पोलिसांना का विचारावी वाटली नाही? असे अनेक प्रश्न या घटनेनं उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता हिंजवडी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
advertisement
पोर्शे कारच्या घटनेची पुनरावृत्ती?
पुण्यातील पोर्शे कार प्रकरण ताज असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये एक विचित्र अपघातच प्रकरण समोर आलंय. प्रेमाच्या त्रिकोणातून एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या मित्राला कारखाली चिरडल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. या घटनेत निलेश शिंदे नामक व्यक्ती हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याला कारखाली चिरडणाऱ्या आरोपी सुशील काळे याला पोलीसांनी अटक केली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 28, 2024 10:21 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पोर्शे कार अपघात ताजा असताना आणखी एक Video व्हायरल; कारने तरुणाला 50 फुट नेलं फरफटत