राज्यातील 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांचा निकाल जाहीर झाला आहे. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या रणधुमाळीत भाजपसह महायतीची यशस्वी घौडदौड पहायला मिळत आहे. या निकालानंतर महाविकास आघाडी सतर्क झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत झालेल्या बिघाडीबाबत भाष्य केले होती. तसेच काँग्रेसची संपर्क साधणार असल्याचे वक्तव्य केले होती. त्यानंतर आता संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
संजय राऊत यांची राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट यांच्यातील जागावाटपाच्या चर्चा अंतीम टप्प्यात आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात अधिकृत युती जाहीर आज किंवा उद्या युती जाहीर होऊ शकते. तर दुसरीकडे मुंबईत महाविकास आघाडी एक राहावी आणि काँग्रेस पक्षानेही सोबत यावं यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. काँग्रेस पक्षाने मुंबईत स्वातंत्र्य लढण्याचा नारा दिला आहे. मात्र तरीही महाविकास आघाडी म्हणून एकत्र या निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत यासाठी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. आज संजय राऊत यांनी राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा केली.
राज ठाकरेंमुळे काँग्रेसनं मुंबईत स्वबळाचा
राज ठाकरेंमुळे काँग्रेसनं मुंबईत स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रसेचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी ही घोषणा केली. मुंबईत काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. स्वबळावर लढणं कार्यकर्त्यांची इच्छा होती. 'कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचे चेन्निथला यांनी स्पष्ट केले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाकरे बंधूंसोबत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंशी युती करण्यासाठी राष्ट्रवादी (SP)चे मुंबईतील स्थानिक नेते अनुकूल असल्याचे समजते.
हे ही वाचा :
