TRENDING:

४८ तासांत मुंबईचं चित्र बदललं... शिंदेंचे २९ नगरसेवक पण त्या २५ नगरसेवकांनी वाढवलं टेन्शन!

Last Updated:

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर असावा, अशी जाहीर इच्छा शिंदेसेनेने बोलून दाखवली. त्यामुळे महपौरपदावरून भाजप शिंदेसेनेमध्ये अंतर्गत कलहाची ही नांदी असू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : देवाच्या मनात असेल तर मुंबईत आपला महापौरही होईल, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर दोन तुटलेली मने सांधण्याचा उत्तम अनुभव पाठीशी असलेले त्यांचे मित्र खासदार संजय राऊत पुढील कामाला लागले आहेत. भाजपचा महापौर होऊ नये, अशी सर्वांचीच इच्छा आहे. मुळात शिंदेसेनेचे निवडून आलेले उमेदवार हे मूळचे शिवसैनिक आहेत, असे सूचकपणे संजय राऊत म्हणाले. तसेच पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत असल्याचे सांगून संजय राऊत यांनी सस्पेन्स वाढवला आहे.
एकनाथ शिंदे-मुंबई महापालिका निवडणूक
एकनाथ शिंदे-मुंबई महापालिका निवडणूक
advertisement

विधानसभा २०१९ च्या निकालात कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यावेळी मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेनेने ताणून धरले. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे संजय राऊत अखेरपर्यंत सांगत राहिले. आताही मुंबई महापालिका निवडणूक निकालांत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने युती आघाडी करूनच महापालिकेवर सत्ता स्थापन करावी लागणार आहे. भारतीय जनता पक्षाला जरी सर्वांत जास्त ८९ जागा मिळाल्या असल्या तरी त्यांना सत्ता स्थापनेसाठी शिंदेसेनेची गरज लागणार आहे. हेच ओळखून एकनाथ शिंदे यांनीही वाटाघाटीची शक्ती द्विगुणित करण्याचे ठरवलेले दिसते.

advertisement

भाजपला खिंडीत गाठण्याचे प्रयत्न

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर असावा, अशी जाहीर इच्छा शिंदेसेनेने बोलून दाखवली. त्यामुळे महपौरपदावरून भाजप शिंदेसेनेमध्ये अंतर्गत कलहाची ही नांदी असू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे शिंदे-भाजपमध्ये अधिक संबंध ताणले जावेत, अशा पद्धतीचे शक्य तेवढे प्रयत्न ठाकरेंची सेना करीत असल्याचे चित्र आहे.

advertisement

शिंदेंचे २९ नगरसेवक पण त्या २५ नगरसेवकांनी वाढवलं टेन्शन

ज्या हॉटेलमध्ये शिंदेसेनेचे नगर सेवक आहेत, त्याच हॉटेलमध्ये मी आज जेवणासाठी जाणार आहे. भाजपचा महापौर व्हावा, असे एकनाथ शिंदे यांनाही वाटत नाही. शिंदेसेनेचे निवडून आलेले नगरसेवक मूळचे मराठी आहेत, शिवसैनिक आहेत. त्यांच्याही मनात मशाल धगधगतेय. एकनाथ शिंदे यांनी जसे बंड केले तसे बंड त्यांच्या पक्षातील लोकांनाही करण्याचा अधिकार आहे. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही हीच सर्वांची इच्छा आहे, असे संजय राऊत म्हणाले. विशेष म्हणजे शिंदेसेनेच्या २९ नगरसेवकांपैकी २५ मराठी नगरसेवक आहेत, ही बाब संजय राऊत यांनी अधोरेखित करून सांगितल्याने त्यांच्याशी पडद्याआड काही चर्चा सुरू आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने चर्चिला जात आहे. त्यामुळे 'त्याच' २५ मराठी नगरसेवकांनी दस्तुरखुद्द शिंदे यांचे टेन्शन वाढवले आहे.

advertisement

मुंबईच्या राजकारणात 'खेला होबे?'

महायुतीचा महापौर बसायचा असता तर शिंदेसेनेचे नगरसेवक कोंडून ठेवले नसते. शिंदेसेनेचा महापौर होणं हे देवेंद्र फडणवीस यांना मान्य होईल का? असा सवाल उपस्थित करून ठाकरेसेनेचा महापौर बसण्याच्या पर्यायांवर बोलण्यासाठी सगळ्या प्रश्नांची उत्तरे आत्ताच कशाला द्यायची असे विचारून पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत, असे सांगत मुंबईच्या राजकारणात खेला होबे होण्याचे संकेतच राऊत यांनी दिले.

advertisement

मुंबईच्या महापौरपदावर उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
10 लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज, राजश्रीनं सोडली नोकरी, यशस्वी उभा केला कॅफे Video
सर्व पहा

आपला महापौर व्हायला पाहिजे, हे आपले स्वप्न आहेच. देवाच्या मनात असेल तर आपला महापौरही बसेल, असे सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. महापौर होण्यासाठीचे संख्याबळ निश्चितपणे आज आपल्याकडे नाही. पण या सगळ्या खेळाला उत्तर देऊन आपण जे यश मिळवले ते निश्चित प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणार आहे, असे ठाकरे म्हणाले.

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
४८ तासांत मुंबईचं चित्र बदललं... शिंदेंचे २९ नगरसेवक पण त्या २५ नगरसेवकांनी वाढवलं टेन्शन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल