विजयादशमीच्या दिनी शिवसेनेच्या दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा नेक्सो सेंटरमध्ये पार पडला. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम यांनी त्यांच्या भाषणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल खळबळजनक आणि वादग्रस्त दावा केला. बाळासाहेबांचं निधन एक दिवसाआधीच झालं होतं. उद्धव ठाकरेंनी त्यांना एक दिवस का ठेवलं. हे बाळासाहेबांवर उपचार केलं हे मला डॉक्टरांनी सांगितलं होतं असा दावा रामदास कदमांनी केला. रामदास कदम यांच्या दाव्यानंतर शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार खडाजंगी होणार असल्याचे संकेत मिळत होते.
advertisement
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना राऊत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिले.
संजय राऊतांनी काय म्हटले?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना रामदास कदमांच्या आरोपाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी राऊतांनी रामदास कदम यांचा दावा खोडून काढला. संजय राऊत यांनी म्हटले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्ण आजारपणात शेवटपर्यंत मातोश्रीवर होतो. आम्हाला माहिती आहे. आता यांच्या तोंडामध्ये कोणीतरी शेण कोंबलं असेल. भीती पोटी आणि त्यांच्यानुसार उगाळत असेल तर तुम्ही आता काय करणार असा उलट सवाल राऊतांनी केला.
संजय राऊतांनी पु़ढे म्हटले की, शिवसेनाप्रमुखांना जाऊन एक दशकाचा काळ उलटला आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करणे हा ज्या शिवसेनेने तुम्हाला आम्हाला मोठे केलं, ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला सगळं काही दिलं. त्यांच्याशी बेईमानी करण्याच्या पद्धतीने असे वक्तव्य असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.