संजय शिरसाट म्हणाले, मी गेली 42 वर्षं राजकारणात आहे. आयुष्यातील ही माझी तिसरी बंडखोरी होती, पण आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासाठी ती पहिलीच वेळ होती. त्या वेळी आम्ही संख्या मोजत होतो. कल्याणकर इतके व्याकुळ झाले होते की त्यांनी जेवणही सोडले होते. चेहऱ्यावर सतत भीती होती, आमदारकी रद्द झाली तर मतदारसंघात काय परिणाम होईल? याची त्यांना चिंता होती. एवढा तणाव आला होता की ते हॉटेलवरून उडी मारण्याच्या विचारात होते.
advertisement
आम्हाला एका एका आमदाराची चिंता: संजय शिरसाट
बंडखोरीच्या वेळी आम्हाला एका एका आमदाराची चिंता होती. कारण एखादा आमदार कमी-जास्त झाला असता, तर आमची सुद्धा आमदारकी रद्द झाली असती. म्हणून आम्ही बालाजी कल्याणकर यांच्यासोबत दोन माणसं नेहमी ठेवली होती, असेही संजय शिरसाट म्हणाले.
50 कोटीसाठी नाही तर जनतेच्या विकासासाठी घेतला निर्णय
संजय शिरसाठांच्या वक्तव्याला आमदार बालाजी कल्याणकर यांनी देखील दुजोरा दिला आहे. तसेच त्यांनी देखील पहिल्यांदाच त्यावेळी त्यांची मनस्थिती काय होती, हे सांगितले. माझे दुहेरी मन होते, माझे मन खचत होतं, मी काही चूक करतोय का? जनतेला धोका देतोय का असे विचार डोक्यात सुरु होते. जनतेने आपल्याला मत दिलीत आपण गद्दारी करतोय का? असे विचार मनात येत होते. त्यामुळे मी तीन दिवस जेवलो नाही , हॉटेलवरुन उडी मारावी असे विचार येत होते. पण शिंदे साहेबांनी विश्वास दिला. आपण जनतेच्या कामासाठी उठाव करतोय अस सांगितले. त्यामुळे मी त्यांच्यासोबत गेलो असे कल्याणकर म्हणाले. 50 कोटीसाठी नाही तर जनतेच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचेही कल्याणकर म्हणाले..
