संजोग वाघेरे यांनी शिवसेनेचे संपर्क नेते तथा आमदार सचिन अहिरे यांना राजीनामा पाठविला आहे. काही अपरिहार्य वैयक्तिक कारणांमुळे मी सध्या माझी संपूर्ण जबाबदारी अपेक्षेप्रमाणे पार पाडू शकत नाही. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेऊन मी माझ्या शहराध्यक्ष आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. हा निर्णय केवळ वैयक्तिक कारणांपुरता मर्यादित असल्याचेही त्यांनी राजीनामा देताना म्हटले आहे.
advertisement
ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदारकी लढवली, पराभूत झाल्यानंतर भाजपची वाट
दरम्यान, वाघेरे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरपद आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपदही सांभाळले आहे. त्यांनी 2024 मध्ये लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाच्या तिकिटावर लढविली होती. पराभवानंतर त्यांना शहरप्रमुखपद दिले. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा त्यांची भाजपमध्ये जाण्याची तयारी सुरू आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेंना धक्का
पुढच्या काही दिवसांत महापालिका निवडणूक होणार आहे. जागा वाटपाबरोबरच उमेदवारी निश्चितीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. वाघेरे यांच्याकडे शहराध्यक्षपद असल्याने साहजिक त्यांच्यावर महापालिकेची पूर्णपणे जबाबदारी होती. परंतु पालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्याने ठाकरे गटाला आता नव्या व्यक्तीकडे शहराध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द करावी लागणार आहे.
