मक्याचे सर्वाधिक दर आजही स्थिर, इतर दरात वाढ
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.00 वाजताच्या रिपोर्टनुसार, 18 डिसेंबर रोजी राज्याच्या कृषी मार्केटमध्ये मक्याची एकूण आवक 35 हजार 097 क्विंटल इतकी झाली. आज मक्याची सर्वाधिक आवक 8 हजार 125 क्विंटल इतकी नाशिक बाजारात झाली. त्या पिवळ्या मक्यास प्रतीनुसार 1543 ते 1884 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 230 क्विंटल मक्यास किमान 2500 तर कमाल 3800 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाला. बुधवारी मक्याला मिळालेला सर्वाधिक बाजारभाव आजही स्थिर आहे, तर इतर दरात वाढ झालेली दिसून येत आहे.
advertisement
Reel पाहिली अन् डोक्यात आयडिया आली, नोकरी करता करता बिझनेस सुरू केला, आता इतकी कमाई
आठवड्यात कांद्याची सर्वाधिक आवक
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज कांद्याची एकूण आवक 2 लाख 65 हजार 547 क्विंटल इतकी झाल्याची नोंद आहे. कांद्याची सर्वाधिक आवक 57 हजार 747 क्विंटल इतकी अहिल्यानगर बाजारात झाली. अहिल्यानगर बाजारात कांद्याला 250 ते 2750 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. तसेच सांगली मार्केटमध्ये आवक झालेल्या 2268 क्विंटल कांद्यास 3300 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाला. बुधवारी मिळालेला कांद्याचा सर्वाधिक भाव आज कमी झाला आहे, तर इतर बाजारांमध्येही दरात चढ-उतार झाली आहे.
सोयाबीनच्या दरात पुन्हा वाढ
राज्याच्या मार्केटमध्ये आज सोयाबीनची एकूण आवक 30 हजार 820 क्विंटल इतकी झाली. सर्वाधिक आवक ही जालना मार्केटमध्ये झाली. जालना मार्केटमधील 4 हजार 699 क्विंटल सोयाबीनला 3500 ते 5100 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. वाशिम मार्केटमध्ये आज सोयाबीनला सर्वाधिक बाजार भाव मिळाला. वाशिम मार्केटमध्ये आवक झालेल्या 4253 क्विंटल सोयाबीनला 6313 रुपये प्रतिक्विंटल असा आजचा सर्वाधिक बाजारभाव मिळाला. बुधवारी नोंदविण्यात आलेल्या उच्चांकी दराच्या तुलनेत आज सोयाबीनच्या भावात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.





