व्हॉट्सअॅप कॉलवरून संभाषण
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी या प्रकरणातील संशयित आरोपी क्रमांक दोन PSI गोपाल बदने आणि आरोपी क्रमांक एक प्रशांत बनकर यांच्यात व्हॉट्सअॅप कॉलवरून संभाषण झाल्याची नवी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिस आता या दोघांची कसून चौकशी करत त्यांच्यात नेमका कोणती चर्चा झाली? याचा तपास केला जातोय.
advertisement
दोघांमध्ये काय संभाषण झालं?
महिला डॉक्टरच्या मृत्यूच्या आधी काही तास पीएसआय बदने आणि प्रशांत बनकर यांच्यात व्हॉट्सअॅपवरून प्रदिर्घवेळ संभाषण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे दोघांमध्ये काय संभाषण झालं? असा प्रश्न विचारला जात आहे. दोघांमध्ये एकच कनेक्शन होतं, ते म्हणजे डॉक्टर महिला... त्यामुळे दोघांनी मिळून डॉक्टरला टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडलं का? असा सवाल विचारला जात आहे.
डिजीटल पुरावे शोधण्यासाठी मुदत
दरम्यान, सुसाईड नोटमध्ये असलेल्या बलात्काराच्या उल्लेखाचा तपास करायचा आहे. डिजीटल पुरावे शोधण्यासाठी काही दिवसांची मुदत आवश्यक आहे. पण मरणारी व्यक्ती कधीही खोटे बोलत नसते, असा दाखला देत आरोपीच्या वैद्यकीय चाचण्या, मोबाईल, वाहन आणि घटनास्थळाचा तपास करण्यासाठी सात दिवसांची पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी यावेळी केली होती.
