पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना तिनं जबाबदार धरलं होतं. या प्रकरणी फलटण पोलिसांकड़ून तपास केला जात आहे. पण डॉक्टर तरुणीच्या मोबाईल फोनवरून तिच्या कुटुंबियांनं हा संशय व्यक्त केला होता.
डॉक्टरच्या मोबालईशी छेडछाड झाली का? अखेर IPS तुषार दोशी यांनी मौन सोडले
डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मोबाईल फोन कुणी वापरला? तिचं व्हॉट्सअॅप कुणी सुरु केलं? त्यावरून कुणी काही मेसेज केले होते का? तिच्या मोबाईल फोनचा पासवर्ड कुणाला माहिती होता का? हे काही महत्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांवर अखेर फलटण पोलिसांनी मौन सोडलंय. तपासात डॉक्टरच्या मोबाईलचे कोणतेही पुरावे डिलीट झाले नाही, सायबर एक्सपोर्ट मार्फत आमची तपासणी सुरू आहे, असे तुषार दोशी म्हणाले.
advertisement
ते स्टेटस डॉक्टरने रात्री ११ वाजून सहा मिनिटांनी कसे लाईक केले?
डॉक्टर तरुणीचा सात वाजता मृत्यू झाल्याचे पोलिसांनी कुटुंबियांना फोनवरून कळवले. परंतु तिच्याच फोनवरून तिच्याच बहिणीच्या व्हॉट्सअॅप स्टेटस पाहून ते लाईक करण्यात आले, ते स्टेटस कुणी पाहिले? कुणी लाईक केले? असे सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले. तसेच डॉक्टर तरुणीचा मृत्यू सात वाजता झाला असेल तर मग तिचा व्हॉट्सअॅप लास्ट सीन रात्री ११ नंतरचे कसे? असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारले.
कुटुंबियांचा पोलिसांच्या भूमिकेवर संशय
एकीकडं डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला तर दुसरीकडं महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या दाव्यावरही तीव्र संपात व्यक्त केलाय. रुपाली चाकणकरांनी साताऱ्यात जावून या प्रकरणी पत्रकार परिषद घेत डॉक्टर तरुणीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं.
डॉक्टर तरुणीच्य़ा आत्महत्येविषयी आजही काही प्रश्न अनुत्तरीत
चाकणकरांच्या या दाव्यानंतर विरोधकांच्या त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आता डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांनी चारित्र्यहनन करू नका असे कळकळीचे आवाहन चाकणकरांना केलंय. डॉक्टर तरुणीच्य़ा आत्महत्येविषयी आजही काही प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्याची उत्तरं पीडित कुटुंबाला मिळाली पाहिजेत तरचं या कुटुंबाला न्याय मिळेल.
