TRENDING:

उदयनराजेंच्या साताऱ्यात महायुती फुटली, शिंदे-अजित पवार मविआसोबत भाजप विरोधात लढणार

Last Updated:

साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यात महायुती फुटल्याची घटना घडली आहे.कारण एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या पक्षाने थेट महाविकास आघाडीच्या पक्षासोबत समविचारी आघाडी तयार केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
satara news
satara news
advertisement

Satara News : साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यात महायुती फुटल्याची घटना घडली आहे.कारण एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या पक्षाने थेट महाविकास आघाडीच्या पक्षासोबत समविचारी आघाडी तयार केली आहे. आता ही आघाडी भाजप विरोधात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूकीत लढणार आहे. त्यामुळे ही निवडणूक कशी पार पडते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

advertisement

साताऱ्यातील महायुती दुभंगली आहे. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडी कडून समविचारी आघाडी पुढे आणली जात आहे. या समविचारी आघाडीत महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी मनसेसह इतर घटक पक्षही असतील असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जाहीर केले आहे.

advertisement

जिथे आम्ही मुलाखती घेतोय. सगळीकडे पॅनेल उभं राहिलं. अख्ख्या जिल्ह्यामध्ये जिथे नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आहे. तिथे सगळीकडे पॅनेल उभं राहिल अशाप्रकारची परिस्थिती आहे. काही ठीकाणी आम्ही भाजप सोडून समविचारी आघाडी करण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत स्थानिक पातळीवर आज चर्चा झाली. आणि या चर्चा पुर्ण होऊन आम्ही एक मताने पॅनेल सर्वीकडे उभं करू असा विश्वास शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

advertisement

यावर आता भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी महायुतीतील राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यासह समविचार आघाडीचा चांगला समाचार घेतला आहे. ही समविचारी आघाडी नव्हे, ही तर समदुखी आहेत. केवळ असुयेपोटी एकत्र आले असून ही अभद्र युती आहे, असा टोला लगावला आहे.

advertisement

तुमचं चिन्ह काय,तुमचा विचार काय हे तुम्ही निश्चित केलं पाहिजे. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक झाली तर त्याला मैत्रिपुर्ण लढत म्हणायची. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक होणार आहे का? हे त्यांनी आधी स्पष्ट करावं.

महायुतीतले घटक पक्ष सत्तेत आहेत. भाजप,एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी हे समविचारी पक्ष आहेत. यांच्यामध्ये मैत्रीपुर्ण लढत होऊ शकते. महायुतीतले घटक महाविकास आघाडी मधल्या लोकांना घेऊन निवडणूक लढवत असतील तर ती अभद्र युती आहे,अशी टीका अतुल भोसले यांनी केली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे काय? शरीराला कसा होतो फायदा? Video
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उदयनराजेंच्या साताऱ्यात महायुती फुटली, शिंदे-अजित पवार मविआसोबत भाजप विरोधात लढणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल